AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बियाणे खरेदी करण्यापूर्वी ही काळजी घ्यावी !
कृषी वार्ताAgrostar
बियाणे खरेदी करण्यापूर्वी ही काळजी घ्यावी !
➡️शेतकरी बंधूंनो बियाणे खरेदी करताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून आणि काळजी घेऊन बियाण्यांची खरेदी करणे गरजेचे आहे. खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या व कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात काही टिप्स आपल्या समोर मांडत आहे. 👉सर्वात महत्वाचे म्हणजे बियाणे खरेदी करताना कुणी कितीही चांगलं वान सांगितलं तर कुणाच्या सांगण्यावर न जाता आपल्या स्वतःच्या शेतात संबंधित पिकात आपल्या गरजा व समस्या काय आहेत व आपण खरेदी करत असलेल्या वानात आपल्या गरजा पूर्ण करणारी किंवा समस्या निराकरण करणारी वैशिष्ट्ये आहेत का व संबंधित वाणाच्या बियाण्याची आपल्या भागाकरिता शिफारस आहे का या सर्व बाबीचा करून बियाण्याची खरेदी करणे गरजेचे असते. 👉 बियाणे किंवा वान खरेदी करताना जे बियाणे किंवा वान आपल्या भागासाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले आहे अशा वानाच्या बियाण्याची खरेदी करण्यासाठी प्राधान्य द्या व यासाठी वेळोवेळी गरजेनुसार तज्ञांचा व चांगल्या अनुभवी प्रयोगशील शेतकरी शेतकऱ्यांचा सल्ला घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागात महत्त्वाच्या पिकावर कोणते कीड-रोग येतात व त्यासाठी नवीन अद्यावत शिफारस केलेल्या कीड व रोग प्रतिकारक वानांना बियाणे म्हणून खरेदी करताना प्राधान्य द्या यासाठी गरजेनुसार संबंधित विषयाचे तज्ञांचा सल्ला घ्यावा. 👉शेतकरी बंधूंनो कोणतेही प्रमाणित बियाणे बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्की पावती घ्या त्यावर बियाण्याचा प्रकार, लॉट क्रमांक, पॅकिंग किती वजनाचा आहे, पॅकिंग ची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख इत्यादी गोष्टी नमूद केल्या आहेत का ते पहा व हे पाहूनच बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. 👉शेतकरी बंधूंनो खरेदी केलेल्या बियाण्याची पावती , बियाण्याचे रिकामे पॅकिंग ह्या गोष्टी व्यवस्थित जपून ठेवा.तसेच बाजारात सीलबंद बियाण्याच्या पिशवीवर प्रमाणित बियाण्याच्या पिशवीला दोन टॅग असतात अशा निळ्या रंगाचा डबल लेबल पाहूनच प्रमाणित बियाणे खरेदी करावे. 👉 प्रमाणित बियाण्याची पिशवी तिन्ही बाजूने आतून व्यवस्थित शिवलेली आहे का ते पहा व बियाण्याची पिशवी शिलाई च्या बाजूने न फोडता त्याच्या विरुद्ध बाजूने फोडावी. 👉आपण भाजीपाला पिकात अनेक बियाणे उत्पादक कंपन्याचे संकरित वाण वापरत असतो हे वान खरेदी करण्यापूर्वी संबंधित बियाणे उत्पादनाची माहिती असलेली तांत्रिक पुस्तिका असेल तर ती मिळवावी व संबंधित वाणाची वैशिष्ट्ये तसेच संबंधित बाबतीत संबंधित बियाणे उत्पादक कंपनीने दिलेल्या सूचना याचे वाचन करून वापर करावा. 👉 शेतकरी बंधूंनो आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवत असलेल्या अनेक शेतकरी बीज उत्पादक कंपन्या बियाणे विक्रीसाठी समोर आल्या आहेत. या सर्व शेतकऱ्याच्या बीज उत्पादक कंपनीची माहिती कृषि विभाग यांच्याकडून घेऊन नामांकित आणि शेतकरी हितात काम करणाऱ्या शेतकरी बिजोत्पादन कंपन्यांना बियाणे खरेदीसाठी प्राधान्य द्यावे.शेतकरी बंधूंनो आगामी खरीप हंगामात बियाणी खरेदीपूर्वी या सर्व सूचनांचा गरजेनुसार वापर करावा. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
1
इतर लेख