कृषी वार्ताAgrostar
बियाणे, खते व माती परिक्षणाची सुविधा!
➡️पंतप्रधान यांनी नवी दिल्ली येथे आयोजित किसान सन्मान संमेलनात देशातील 3.3 लाख किरकोळ खत दुकानांचे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र मध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली. तसेच ही दुकाने टप्प्याटप्प्याने पीएमकेएसकेमध्ये बदलण्यात येतील. या केंद्रांवर एकाच छताखाली बियाणे, खते आणि मातीच्या चाचणीची सुविधा आता उपलब्ध होणार आहे.
➡️तसेच या केंद्रांवर शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित गोष्टींची माहिती करून दिली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजना त्यांना सांगण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावर किमान एका किरकोळ दुकानाला मॉडेल शॉप म्हणून विकसित केले जाईल, अशी सरकारची योजना आहे. या अंतर्गत जवळपास 3,30,499 किरकोळ खतांची दुकाने पीएमकेएसकेमध्ये रूपांतरित केली जातील.
➡️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 600 नवीन पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन केले. तसेच या केंद्रांवर केवळ खतच उपलब्ध होणार नाही, तर बियाणे, उपकरणे, माती परीक्षण आणि शेतकऱ्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे, असे मोदी म्हणाले. आणि विशेष म्हणजे ही केंद्रे वन स्टॉप शॉप म्हणून विकसित केली जाणार आहेत.
➡️संदर्भ:-Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.