AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाबा रामदेव यांनी केले क्रेडिट कार्ड लाँच!
शेतीतील नवा शोध!tv9marathi
बाबा रामदेव यांनी केले क्रेडिट कार्ड लाँच!
➡️पतंजलीच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. योग गुरू बाबा रामदेव यांनी पंजाब नॅशनल बँक आणि रुपेच्या मदतीने पतंजलीचे क्रेडिट कार्ड लॉंच केले आहे. ➡️पंतजलीच्या क्रेडिट कार्ड लॉंचिगप्रसंगी बोलताना बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की, पतंजलीच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्राहकांसाठी आता पतंजलीने क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले आहे. ➡️या कार्डच्या माध्यमातून पतंजलीचे प्रोडक्टस खरेदी केल्यास ग्राहकांना मोठ्याप्रमाणात सुट मिळणार आहे. ग्राहकांना क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी ५० दिवसांचा वेळ देण्यात येईल. त्यानंतर जर ग्राहक बिल भरू शकला नाही तर थकित रकमेवर १२ टक्क्यांनी व्याज आकारण्यात येईल, जास्तीत जास्त दीड वर्षांच्या आत तु्म्हाला थकीत रक्कम भरणे बंधनकारक असणार आहे. ➡️या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रामदेव बाबा यांनी क्रेडिट कार्डची घोषणा केली होती. त्यानंतर आता या कार्डचे लॉंचिग करण्यात आले आहे. पाच लाखांच्या विम्याचे कवच ➡️पतंजलीचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. तुम्हाला यामध्ये दोन कार्ड मिळतील जे तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तीसोबत देखील शेअर करू शकता. ➡️या कार्डचे आणखी एक फायदा म्हणजे पतंजलीचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकाला पंजाब नॅशनल बँकेकडून पाच लाखांच्या विम्यान्याची देखील मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कुठे उपलब्ध होणार? ➡️तुम्ही जर पतंजलीच्या क्रेडित कार्डची सेवा घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला पतंजलीचे क्रेडिट कार्ड हे पतंजलीचे मेगा स्टोअर, पतंजलीचे रुग्णालये आणि पीएनबी बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध होतील. पतंजलीचे साठ टक्के कार्ड हे पतंजली रुग्णालये आणि मेगा स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील, तर चाळीस टक्के कार्ड हे पीएनबीच्या शाखांमध्ये उपलब्ध होतील. संदर्भ:-TV9Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
1