AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजरी वरील अळी विषयी (इअरहेड वर्म) माहिती मिळवून, नियंत्रणाबद्दल जाणून घेऊया.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बाजरी वरील अळी विषयी (इअरहेड वर्म) माहिती मिळवून, नियंत्रणाबद्दल जाणून घेऊया.
खरीप तसेच उन्हाळ्यामध्येही बाजरी पिकाची लागवड केली जाते. सध्या बाजरीचे पीक कणीस धारणेच्या अवस्थेत किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत अवस्थेत असेल. या पिकात चीक भरण्याच्या अवस्थेत या अळी किंवा ब्रिस्टल बीटल मूळे बरेच नुकसान होते. त्यामुळे याच्या नियंत्रणासाठी योग्य उपाय करणे गरजेचे आहे._x000D_ _x000D_ • ही कीड विविध पिकांवर उपजीविका/ प्रादुर्भाव करत असल्याने हि कीड आपल्या बाजरी पिकामध्ये देखील प्रादुर्भाव करते._x000D_ • या अळ्या भिन्न रंगाच्या असून त्यांच्या शरीरावर समांतर रेषा असतात._x000D_ • सुरुवातीला या अळ्या बाजरीच्या कणसावरील तंतुमय लव खातात._x000D_ • चीक भरण्याच्या अवस्थेत अळ्या कोवळ्या दाण्यांवर प्रदर्भाव करून दाणे फस्त करतात परिणामी उत्पादनात घट येते. _x000D_ • याच्या नियंत्रणासाठी पूर्व तयारी म्हणजेच, उन्हाळ्यात जमीन खोल नांगरून तापू द्यावी. त्यामुळे जमिनीतील किडींचे कोष उष्णतेने मारून जातात. _x000D_ • या किडींचा पिकात प्रादुर्भाव दिसून येताच, नियंत्रणासाठी प्रति एकरी ८ ते १० फेरोमोन सापळे लावावेत. _x000D_ • तसेच पक्षांद्वारे या किडींचे नियंत्रण होत असल्याने, पिकात पक्षी आकर्षित होण्यासाठी विविध उपाय करावेत. _x000D_ • हि कीड/ अळी पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव करत असल्याने रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळविता येत नाही. _x000D_ • प्रादुर्भावाच्या सुरुवातीस नियंत्रणासाठी निम आधारित कीटकनाशके (१% ईसी) @२० मिली किंवा (०.१५% ईसी) @ ४० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. _x000D_ • बव्हेरिया बेसियाना हि बुरशीजन्य पावडर @ ४० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरेंजेनिसीस हि जिवाणूजन्य पावडर @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._x000D_ _x000D_ संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!_x000D_
95
1
इतर लेख