AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा लागवडीविषयी माहिती!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा लागवडीविषयी माहिती!
➡️ बटाटा पिकास थंड हवामान मानवते. त्यामुळे बटाटा लागवड हि सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत करावी. ➡️ लागवडीसाठी मध्यम पोयट्याची व चांगला पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. खोडाचा तसेच कंदाचा चांगला विकास होऊन अधिक उत्पादन घेण्यासाठी लागवड गादीवाफा तयार करून करावी. ➡️ लागवडीसाठी बाजाराच्या मागणीनुसार योग्य वाणांची निवड करावी. ➡️ प्रक्रिया उद्योगासाठी बटाटा लागवड करावयाची असल्यास कुफ्री चिपसोना 1, कुफ्री चिपसोना 2, कुफ्री हिमसोना, कुफ्री फ्रायसोना, लेडी रोसेटा, संतना, सर्फोमेरा यांसारख्या वाणांची निवड करावी. तसेच भाजीसाठी वापरला जाणारा बटाटा लागवडीसाठी कुफ्री बादशाह, कुफ्री लवकर, कुफ्री पुखराज, कुफ्री चंद्रमुखी, कुफ्री ज्योती, कुफ्री लालिमा यांसारख्या वाणांची निवड करावी. लागवडीसाठी एकरी 500 ते 700 किलो निरोगी व प्रक्रिया केले बेणे वापरावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-,अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
2