AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पोखरणारी अळी नियंत्रण
गुरु ज्ञानAgrostar
बटाटा पोखरणारी अळी नियंत्रण
👉बटाटा पिकावर अळीचा प्रादुर्भाव गंभीर समस्या निर्माण करतो. अळी सुरुवातीला पान, देठ आणि कोवळ्या खोडांमध्ये शिरून नुकसान करत पुढे जमिनीतील उघड्या बटाट्यांवर मादी अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या बटाट्याच्या डोळ्यांतून आत प्रवेश करून गरामध्ये बोगदे तयार करतात. त्यामुळे बटाट्याचे वजन कमी होते, गुणवत्ता खालावते आणि बाजारमूल्य घटते. 👉या समस्येवर उपाय करण्यासाठी कीटकनाशकांचा योग्य वापर आवश्यक आहे. क्लोरोपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रीन 5% इसी घटक असणारे अरेक्स कीटकनाशक @1 लिटर प्रति एकर व थायमेथॉक्झाम 75% एसजी घटक असणारे शटर कीटकनाशक @100 ग्रॅम प्रति एकर या दोन्हीची एकत्र आळवणी अथवा ठिबक सिंचनाद्वारे वापर करावा. 👉🏻याशिवाय, जमिनीत उघडे बटाटे टाळणे, स्वच्छता राखणे आणि पिकांची योग्य निगा राखणे हे देखील महत्त्वाचे आहे. वेळेवर उपाय केल्यास पिकाचे नुकसान टाळून उत्पादन व गुणवत्तेत वाढ होऊ शकते. 👉🏻संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख