अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पोखरणारी अळी नियंत्रण!
अळी सुरवातीला पानात, देठात तसेच कोवळ्या खोडात शिरून आतील भाग पोखरते तसेच जमिनीतील उघड्या पडलेल्या बटाट्यांवर मादी अंडी घालते, अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या बटाट्याच्या डोळ्यातून आत शिरून बटाटे पोखरतात आणि गराच्या आत किंवा खाली बोगदे पाडतात. त्यांची विष्टा डोळे व अंकुराजवळ दिसते. त्यामुळे बटाट्याचे वजन घटते तसेच प्रतही खराब होते. यावर उपाय म्हणून अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर पिकावर क्लोरोपायरीफॉस घटक असेलेले कीटकनाशकाची @ 2 ते 3 मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी घ्यावी.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.