AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पीक लागवडीचे नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
बटाटा पीक लागवडीचे नियोजन!
🥔खरिफ आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात बटाटा पिकाची लागवड केली जाते. रब्बी हंगामातील बटाटा लागवडीचे नियोजन सप्टेंबर महिन्यापासून केले जाते. 🥔बटाट्याच्या योग्य वाढीसाठी 22 ते 24 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. लागवडीसाठी एकरी 500 ते 600 किलो बेणे वापरावे. 🥔जमिनीमध्ये पाणी साचून राहत असल्यास बटाटा विकासाच्या काळात फळ सड होऊ शकते त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होणारी व भुसभुशीत, पोयट्याची जमीन लागवडीसाठी निवडावी. 🥔योग्य वाढ व विकास होण्यासाठी लागवड ही गादी वाफ्यावर करावी. सरी वरंबा पद्धतीचा वापरही केला जातो. दोन ओळींमधील अंतर दोन फूट तर झाडांमधील अंतर जमिनीचा पोत व जातिनुसार 30 सेंमी किंवा 45 सेंमी ठेवावे. 🥔संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
10