AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पिकात करपा रोग समस्या आणि उपाययोजना
गुरु ज्ञानAgroStar
बटाटा पिकात करपा रोग समस्या आणि उपाययोजना
👉🏻बटाटा पिकामध्ये करपा रोगाची समस्या दोन प्रकारची असते – लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा. लवकर येणाऱ्या करप्याचा प्रादुर्भाव पिकाला 5-6 आठवड्यांचे झाल्यावर दिसून येतो. यामध्ये पानांच्या पृष्ठभागावर तांबडे-काळसर गोलसर ठिपके दिसून येतात. हे ठिपके एकमेकांत मिसळून मोठे होतात, पाने पिवळी पडतात, आणि झाडांची वाढ खुंटते. 👉🏻उशिरा येणाऱ्या करप्याचा प्रादुर्भाव झाडाच्या खालच्या पानांपासून सुरू होतो. फिक्कट तपकिरी ते काळपट डाग पानांच्या टोकांवर व कडांवर दिसून येतात. हे डाग पुढे सडून दुर्गंधी येते, ज्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. 👉🏻करपा रोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मेटॅलॅक्झिल 8% + मॅनकोझेब 64% डब्लूपी घटक असणारे मेटल ग्रो बुरशीनाशक 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी वेळेवर केल्यास करपा रोगाचे नियंत्रण होऊन पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते. 👉🏻यासोबतच पिकाचे निरीक्षण करणे, रोगप्रतिकारक वाणांची निवड करणे, आणि योग्य प्रकारे आंतरमशागत व खत व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे पिकाचे नुकसान कमी होऊन उत्पन्न अधिक मिळते. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख