AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पिकातील करपा रोग करतोय हैराण!
गुरु ज्ञानAgrostar
बटाटा पिकातील करपा रोग करतोय हैराण!
🌱बटाटा पिकामध्ये लवकर येणाऱ्या करप्याची समस्या पीक 5 ते 6 आठवड्यांचे झाल्यावर दिसून येते. प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांच्या पृष्ठभागावर तांबडे काळसर गोल ठिपके दिसतात. पुढे ते ठिपके एकमेकांत मिसळून अनियमित आकाराचे काळसर मोठे होतात, पाने पिवळी पडून झाडांची वाढ खुंटते. उशिरा येणाऱ्या करप्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाच्या खालील पानांवर फिक्कट तपकिरी ते काळपट डाग दिसतात. रोगाची सुरवात पानाच्या टोकांपासून व कडांपासून होते. रोगट भाग सडून त्यास उग्र वास येतो. 🌱प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मेटॅलॅक्झिल 8% + मॅनकोझेब 64% डब्लूपी घटक असणारे मेटल ग्रो बुरशीनाशक @40 ग्रॅम प्रति 15 लिटर प्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
1