AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा काढणी करतेवेळी घ्यावयाची काळजी!🥔🥔
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
बटाटा काढणी करतेवेळी घ्यावयाची काळजी!🥔🥔
⏩ यंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बटाटा पिकाची लागवड जमिनीच्या व पाण्याच्या उपलब्धते नुसार वेगवगळ्या पद्धतीने होते. त्यामुळे योग्य पद्धतीचा अवलंब करून बटाटा पिकाची काढणी करावी. ⏩ बटाटा पिकाच्या जाती व वापरा नुसार हे पीक ७५ ते ११० दिवसांत काढणी योग्य होते. बटाटा पिकाची पाने पिवळी पडून झाड सुकून जाईपर्यंत जमिनीत बटाटे पोसत असतात. काढणीपूर्वी पिकास १० ते १२ दिवस पाणी देणे बंद करावे त्यामुळे बटाट्याची साल घट्ट होते आणि बटाट्यास चकाकी येते. पाणी बंद केल्यावर झाडे जमिनीलगत बुंध्याजवळ विळयाच्या सहाय्याने कापून घ्यावीत. कापलेली झाडे काढणीपर्यंत त्याच ठिकाणी ठेवल्यास बटाटे हिरवे पडण्याचे प्रमाण कमी होते. महाराष्ट्रात बटाटा पिकाची लागवड जमिनीच्या व पाण्याच्या उपलब्धते नुसार वेगवगळ्या पद्धतीने होते. त्यामुळे बटाटा काढणी वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. १) कुदळीच्या सहाय्याने बटाटा काढणी. २) बैलनांगराच्या सहाय्याने बटाटा काढणी. ३) ट्रॅक्टरचलित काढणी यंत्राच्या सहाय्याने बटाटा काढणी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
22
5
इतर लेख