AgroStar
बटाटयाची आधुनिक शेती
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटयाची आधुनिक शेती
• बटाटा हे एक असे पीक आहे, जे इतर पिकांच्या तुलनेत प्रति युनिट क्षेत्राला अधिक उत्पादन देते तसेच प्रति हेक्टरी उत्पन्न देखील जास्त आहे. तांदूळ, गहू, ऊसनंतर बटाटा चौथ्या क्रमांकावर आहे.
हवामान:- बटाटा हे समशीतोष्ण हवामानात येणारे पीक आहे. सर्वसाधारणपणे, चांगल्या शेतीसाठी, दिवसाचे तापमान २५-३० डिग्री सेल्सियस आणि रात्रीचे तापमान ४-१५ डिग्री सेल्सिअस असावे. सुमारे ३० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात, बटाटा पिकामध्ये बटाटाची वाढ पूर्णपणे थांबते. • जमीन आणि मशागत:- बटाटा या पिकासाठी जमिनीचा ६ ते ८ सामू असणारी जमीन लागते. परंतु वालुकामय आणि चिकणमाती यांसारखी पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते. जमीन नांगरानी २० ते २५ सेंमी नांगरावी. १ महिनाभर जमिन ऊनात तापवून द्यावी. पुन्हा १ आडवी नांगरणी करावी. ढेकळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. • लागवडीची कालावधी:- साधारणत: लवकर पक्व होणाऱ्या वाणांची लागवड सप्टेंबरच्या पंधरवड्यापासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी, मुख्य पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पंधरवड्यानंतर होणे आवश्यक असते. • वाण:- भाज्यांसाठी प्रसिद्ध - कुफरी ज्योती, कुफरी बादशाह, कुफरी लवकर, कुफरी लालिमा, कुफरी चंद्रमुखी इ. प्रक्रिया उद्योगासाठी:- कुफरी चिप्सोना १, कुफरी चिप्सोना २, कुफरी हिमसोना, कुफरी फ्रायसोना, लेडी रोसेटा, संताना, सर्फोमेरा इ. • माती परीक्षणानुसार किंवा प्रति हेक्टरी झिंक सल्फेट @२५ किलो आणि फेरस सल्फेट @ ५० किलो या प्रमाणात लागवडीपूर्वी द्यावे. जर हिरवळीच्या खताचा वापर केला नसेल, तर चांगले कुजलेले शेणखत १५-३० टन प्रति हेक्टरी पसरावे. त्यामुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते. • बियाणांची लागवड:- जर जमिनीत पुरेसा ओलावा नसेल, तर पूर्व पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. बियाणाच्या आकाराचे बटाटा कंद कुडामध्ये पेरले जातात आणि मातीने झाकून हलके वरंबे बनवले जातात. बटाटा लागवड ही बटाटे रोपे लावून केल्यास वेळ, श्रम आणि पैशाची बचत केली जाऊ शकते. • पाणी व्यवस्थापन:- पिकाच्या योग्य वाढीसाठी आणि विकासासाठी आणि चांगले उत्पादन मिळविण्यासाठी ७-१० वेळा पाणी देणे आवश्यक आहे. जर पेरणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर लागवडीच्या २-३ दिवसांत हलके पाणी देणे बंधनकारक आहे. संदर्भ :- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ अॅक्सीलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
417
10
इतर लेख