बचत गटांना मिळणार कृषी अवजारांचे अनुदान!
योजना व अनुदानअ‍ॅग्रोवन
बचत गटांना मिळणार कृषी अवजारांचे अनुदान!
➡️ जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या महासोना कृषी अवजारे योजनेत साहित्य खरेदी करणाऱ्या बचत गटांना अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या मान्यतेअभावी आजवर हे बचत गट अनुदानापासून वंचित होते. ➡️ शेतकरी, शेतमजूर महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने तत्कालीन प्रशासक आयुष प्रसाद यांच्या काळात ‘महासोना शेत अवजारे योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला होता. योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ३० लाख रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली होती. शेतमजूर महिलांच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर शेत अवजारे देण्याचा उद्देश समोर ठेवून सदर योजना राबविण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले होते. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीसुद्धा स्थापन करण्यात आली होती. ➡️ योनजेसाठी महिला बचत गटांकडून ग्रामसेवक, कृषी सहायक, अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज मागविण्यात आले होते. महिलांच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सदर नावीन्यपूर्ण योजनेला दिरंगाई आणि शासन निर्णयाचा फटका बसल्याने या नावीन्यपूर्ण योजनेला ब्रेक लागला होता. आता त्याचा मार्ग मोकळा झाला असून यावर्षी या योजनांवर बजेटमध्ये टोकन ठेवण्यात आले असल्याने सर्वसाधारण सभेमध्ये दोन वर्षांपासून साहित्य खरेदी करून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला बचत गटांना लाभ मिळणार आहे. या अवजारांची केली होती शिफारस ➡️ महासोना शेत अवजारे योजनेसाठी अर्ज करणाऱ्या पात्र महिला बचत गटांनी सायकल डवरा, सुरक्षा कीट, ठिंबक संच गुंडाळणी यंत्र, बीज प्रक्रिया ड्रम, स्पायरल सेपरेटर कम ग्रेडर, १० विळे, १० कोळपे, १० फावडे, १० कुदळ, १० घमेले विकत घेतल्यास त्यांना अनुदान देण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यीय समितीने केली होती. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
46
19
इतर लेख