AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बँकांना १४ दिवसाच्या आत KCC जरी करण्याचे आदेश!
सल्लागार व्हिडिओMS Dhulap
बँकांना १४ दिवसाच्या आत KCC जरी करण्याचे आदेश!
➡️किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं.कृषी आणि शेतकरी कल्याण विषयक संसदीय सल्लागार समितीची नुकतीच बैठक झाली. समितीने किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या विविध पैलूंवर चर्चा केली. ➡️समितीला संबोधित करताना, केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांना KCC पूर्ण करण्यासाठी मोहीम राबवत आहे जेणेकरून उर्वरित सर्व पंतप्रधान किसान लाभार्थ्यांना समाविष्ट करता येईल. ते म्हणाले की, 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी सर्व प्रशासकीय शुल्क जसे की प्रक्रिया शुल्क, तपासणी शुल्क, खातेवही, फोलिओ फी इत्यादी माफ करण्यात आले आहेत. जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत देऊन स्वस्त दरात कर्ज मिळू शकेल. ➡️कृषी मंत्र्यांनी समिती सदस्यांना असेही सांगितले की KCC साठी फॉर्म सुलभ करण्यात आला आहे आणि संपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून १४ दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड जारी करण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत.ते म्हणाले की, शेतकर्‍यांना सवलतीत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँका आणि इतर भागधारकांच्या सतत आणि एकत्रित प्रयत्नांच्या परिणामी, 4 मार्च 2022 पर्यंत सुमारे 2.94 कोटी रुपये 3.22 लाख कोटी रूपयांच्या मंजूर प्रत मर्यादेत सुमारे २.९४ कोटी शेतकऱ्यांना KCC योजनेअंतर्गत लाभ देऊन मैलाचा टप्पा गाठला आहे .➡️संदर्भ: MS Dhulap हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
10
इतर लेख