AgroStar
फ्लिपकार्ट वरून केवळ 1 रुपयात खरेदी करा किराणा!
कृषी वार्ताtv9marathi
फ्लिपकार्ट वरून केवळ 1 रुपयात खरेदी करा किराणा!
➡️ सातत्याने वाढत जाणारी महागाई हा सध्याचा चर्चेचा विषय बनला आहे. काही वर्षांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. महागाईच्या या काळात एक रुपयांना साधे चॉकलेटही मिळत नाही. गहू, तांदूळ आणि डाळीचे भाव गगनाला भिडले आहे. पण अशावेळी जर आम्ही तुम्हाला सांगितले की तुम्हाला 1 रुपयात एक किलो साखर किंवा 1 रुपयात एक किलो गव्हाचे पीठ मिळाले तर…..चकित झालात ना? पण हे खरं आहे. यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाईन ऑर्डर करावी लागणार आहे. ही ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला घरपोच माल दिला जाईल. अजूनही विश्वास बसत नाही, पण ही बातमी अगदी खरी आहे. Flipkart या ई-कॉमर्स साईटने ही नवीन योजना सुरु केली आहे. घरगुती वस्तू, किराणा सामानासाठी फ्लिपकार्टने एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ज्यावर सुपर सेवर डेज अंतर्गत विविध ऑफर्स दिल्य जातात. 1 रुपयांत कोणते किराणा सामान? ➡️ फ्लिपकार्टच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुपरमार्टवर अनेक वस्तू या MRP च्या किंमतीपेक्षा कमी दराने उपलब्ध आहेत. अनेक ग्राहकांना खूश करण्यासाठी कंपनीने अवघ्या एका रुपयात किराणा सामान उपलब्ध करुन दिले आहेत. सध्या तुम्हाला 1 रुपयात 1 किलो गव्हाचे पीठ मिळत आहे. सध्या बाजारात ज्याची किंमत ही 57 रुपये आहे. तसेच एका उत्तम कंपनीची एक किलो साखरही तुम्हाला 1 रुपयात मिळत आहे. ज्याची किंमत ही 60 रुपये आहे. 1 रुपयात बदाम आणि देशी तूपही ➡️ गव्हाचे पीठ आणि साखर या व्यतिरिक्त 1 रुपयात 100 ग्रॅम शुद्ध देशी तूप मिळत आहे. ज्याची किंमतही साधारण 55 रुपये आहे. तसेच 1 रुपयांना 100 ग्रॅम बदामही मिळत आहे. ज्याची किंमतही 125 रुपये आहे. याशिवाय 64 रुपये किंमत असलेले बेसन पीठ हे केवळ 9 रुपयांत उपलब्ध आहे. तर 30 रुपये किंमत असलेले बिस्किट देखील या ठिकाणी 9 रुपयांना मिळत आहे. दरम्यान फ्लिपकार्टच्या या 1 रुपयांच्या डीलमध्येही वारंवार बदल होत आहेत. ग्राहकांसाठी काही अटी-शर्ती ➡️ दरम्यान ही योजना पाहिली तर तुम्हाला याचा 100 टक्के फायदा मिळतो आहे, असे वाटते. मात्र यासाठी काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. मात्र 1 रुपयांची ऑफर असणाऱ्या केवळ तीन वस्तू ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तसेच यासाठी तुम्हाला किमान 650 रुपयांची खरेदी करावी लागेल. त्यापलीकडे या वस्तूंसाठी तुम्हाला 50 रुपये डिलिव्हरी शुल्क द्यावे लागेल. जर तुम्हाला हे 50 रुपये वाचवायचे असतील तर यासाठी तुम्हाला किमान 1300 रुपये खरेदी करावी लागेल. म्हणजे एकंदर जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करण्यात तरबेज असाल, तरच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. संदर्भ:- tv9marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
27
इतर लेख