AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
फॉस्फोरिक अॅसिडने ठिबक सिंचनाची सफाई कशी करावी? ४ टप्प्यांची संपूर्ण पद्धत
फॉस्फोरिक अॅसिडने ठिबक सिंचनाची सफाई: ४ टप्प्यांची संपूर्ण पद्धत!👉 ठिबक सिंचन बसवल्यानंतर पाईप आणि ड्रिपरमध्ये क्षार जमा होऊन चोकअप होतो आणि सर्व ठिकाणी सारखे पाणी पोहोचत नाही. या व्हिडिओमध्ये फॉस्फोरिक अॅसिडने ठिबक साफ करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत सांगितली आहे.👉 स्टेप १: आधी १-२ तास फक्त पाणी चालवा. प्रेशर दीड ते दोन ठेवा आणि वेगवेगळ्या ड्रिपरवर १ तासात किती पाणी येते ते मोजून चोकअप तपासा.👉 स्टेप २: २०० लिटरच्या ड्रममध्ये पाणी घेऊन त्यात ३ ते ५ किलो फॉस्फोरिक अॅसिड हळूहळू टाका (एका एकरासाठी साधारण १.५ ते २ किलो). नेहमी पाण्यात अॅसिड टाका, अॅसिडमध्ये पाणी नाही. व्हेंच्युरीद्वारे ते ठिबकमध्ये सोडा, ३०-४० मिनिटे ते १ तास थांबा, मग एंड कॅप आणि फ्लश व्हॉल्व्ह उघडून १०-१५ मिनिटे काळे पाणी बाहेर काढा, स्वच्छ पाणी येईपर्यंत.👉 स्टेप ३: एंड कॅप आणि फ्लश व्हॉल्व्ह बंद करून पुन्हा २०० लिटर पाण्यात २ ते ३ किलो अॅसिड सोडा आणि ते किमान १२ तास (रात्रभर) ड्रिप लाइनमध्ये राहू द्या. दुसऱ्या दिवशी एंड कॅप उघडून फ्लश करा. यामुळे ठिबक सुमारे ८०-९०% स्वच्छ होते.👉 स्टेप ४: तिसऱ्यांदा २ ते ३ किलो अॅसिड द्या (प्रति एकर १ ते २ किलो) आणि एंड कॅप बंद ठेवून अर्धा ते १ तास चालू द्या, म्हणजे ड्रिपरच्या आतील बारीक नळीतील क्षारही निघून जातो. अशा प्रकारे ३ वेळा अॅसिड आणि १ वेळ पाण्याने ठिबक ९५% किंवा कधी कधी १००% पर्यंत स्वच्छ होऊ शकते.👉 पाण्याचा TDS १००० पेक्षा जास्त असेल तर शेवटची प्रक्रिया दर २० दिवसांनी पुन्हा करा. अनेक शेतकरी आठवड्यातून एकदा २ किलो फॉस्फोरिक अॅसिड देतात.👉 फॉस्फोरिक अॅसिड ठिबक साफ करण्यासोबत पाण्याचा पीएच कमी करते आणि रूट झोनचा पीएच ६.५ ते ७.५ दरम्यान ठेवते. प्रत्येक अॅसिड वाईट नसते, पण जाळणारी तीव्र अॅसिड्स वापरू नका.👉 अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा.👉संदर्भ : AgroStar Indiaवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
1
0