गुरु ज्ञानAgrostar
फुलकोबी पिकातील ब्लाइन्डनेस समस्या!
🌱कोबी आणि फुलकोबी पिकातील ब्लाइन्डनेस समस्येमध्ये झाडाचा मध्य पॉईंट/शेंडा तयार होत नाही परिणामी गड्डा लागत नाही व झाडाची पाने लांब आणि गर्द हिरव्या रंगाची होतात.
🌱अतिउष्ण किंवा अतिथंड तापमान, गड्डा लागण्याच्या वेळी आंतरमशागतीची कामे करताना गड्ड्यास ईजा झाली तर किंवा किडीने(थ्रिप्स) किंवा पक्ष्यांनी गड्डा नष्ट केल्यास हि समस्या येते.
🌱यावर उपाययोजना म्हणून लागवडीसाठी योग्य हंगामात योग्य वाणांची निवड करावी. वेळीच कीड नियंत्रित ठेवावी. अशी झाडे आढळून आल्यास काढून नष्ट करावी.
🌱संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.