गुरु ज्ञानAgrostar
फुलकोबी पिकातील ब्राऊनिंग समस्या!
🌱फुलकोबी पिकामध्ये खोडाच्या आतील भागात तडे जाऊन आतील भागात जमिनीपासून ते गड्ड्यापर्यंत पोकळी निर्माण होते.
🌱जास्त अंतरावरलागवड केल्यास तसेच अतिरिक्त नत्रयुक्त खतांचा वापर केल्यास खोड पोकळ होते.
🌱बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे गड्डा तपकिरी रंगाचा होऊन चव कडवट लागते. तसेच खोड आतील बाजूस पोकळ राहते.
🌱यावर उपाययोजना म्हणून रोपांची योग्य अंतरावर लागवड करावी.संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. पिकामध्ये बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा.
🌱संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.