AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फुलकोबी गड्डा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना
गुरु ज्ञानAgroStar
फुलकोबी गड्डा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना
👉फुलकोबी पिकात गड्डा सेटिंग झाल्यानंतर गड्ड्याची योग्य फुगवणी होण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणे आवश्यक असते. यासाठी विद्राव्य खतांचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. 👉फुलकोबीच्या गड्ड्याची फुगवणी वाढवण्यासाठी विद्राव्य 00:12:45 @ 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे फायदेशीर ठरते. या सोबत चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स, ज्यामध्ये विविध सूक्ष्म पोषक तत्त्वे असतात, ते न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात एकत्र करून फवारणी करणे आवश्यक आहे. 👉ही फवारणी गड्ड्यांची चांगली वाढ आणि फुगवणीसाठी मदत करते, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते आणि गड्ड्यांचा आकार आकर्षक होतो. याशिवाय, कॅल्शिअम नायट्रेट @ 5 किलो प्रमाणात ठिबक मधून एकदाच सोडल्याने गड्ड्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या कॅल्शिअमची पूर्तता होते, ज्यामुळे गड्डे मजबूत आणि टिकाऊ होतात. 👉या योग्य व्यवस्थापनामुळे फुलकोबीचे गड्डे दर्जेदार होतात आणि उत्पादनात वाढ होते. शेतकऱ्यांनी या सल्ल्यानुसार खते आणि पोषक तत्त्वांची योग्य मात्रा वापरल्यास फुलकोबी पिकातून चांगले उत्पादन आणि अधिक नफा मिळू शकतो. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
1