AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फुलकिडे (थ्रिप्स) किडीचे जीवनचक्र
आर्थिक महत्व:- सामान्यत: कापूस, मिरची, कांदा, लसूण आणि विविध फळ पिकांसाठी हि कीड हानिकारक आहे. काही प्रजाती व्हायरल रोगांचा प्रसार करतात.
जीवनचक्र:- _x000D_ _x000D_ अंडी:- मादी कीड पानांच्या ऊतीमध्ये सुमारे ५० ते ६० अंडी देते. अंड्याचा कालावधी साधारणतः ४ ते ९ दिवसांचा असतो._x000D_ कीड:- फुलकिडे हे फिकट हिरव्या रंगाचे असतात. किडीच्या या अवस्थेचा कालावधी सुमारे ४ ते ६ दिवसांचा असतो._x000D_ पतंग:- प्रौढांची लांबी १ ते २ मिमी असून तपकिरी / काळ्या रंगासह पिवळे असतात. प्रौढ कीड खूप सक्रिय असते._x000D_ कोषावस्था:- प्रौढ कीड जमिनीमध्ये २.५ सें.मी. खोलीवर जाऊन कोषावस्थेत जाते._x000D_ _x000D_ नियंत्रण:- _x000D_ _x000D_ • पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव आढळून येताच निम आधारित कीटकनाशकाची फवारणी करावी._x000D_ • अधिक प्रादुर्भाव झाल्यास ब्यूप्रोफेनझिन २५ एससी @२० मिली किंवा क्लोथिनिडिन ५० डब्ल्यूजी @५ ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन ५० डब्ल्यूपी@१० ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ एससी @७ मिली किंवा सायनट्रेनिलिप्रोल १०.२६ ओडी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
157
0