AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळ पोखरणाऱ्या अळीचे जैविक नियंत्रण
जैविक शेतीशेतकरी मासिक
फळ पोखरणाऱ्या अळीचे जैविक नियंत्रण
साधारणपणे टोमॅटो, वाटाणा, वांगी, भेंडी पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या अळीचे वेळीच नियंत्रण करावे.
• या अळीचे नियंत्रण करण्यासाठी मुख्य पिकामध्ये मका व चवळी पिकाची सापळा पीक म्हणून लागवड करावी. • टोमॅटो पिकामध्ये १४-१५ ओळीनंतर २ ओळी झेंडूच्या लावाव्यात. झेंडूची लागवड टोमॅटो पिकाच्या १५-२० दिवस अगोदर करावी. • पीक लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी शेतीमध्ये ट्रायकोग्रामा चीलोनीस हे कीटक ४०-४५ हजार प्रति एकरी सोडवीत म्हणजेच हे कीटक फळे पोखरणाऱ्या अळीचे पतंगाच्या अंड्यात स्वत:ची अंडी घालतात. त्यामुळे फळे पोखरणाऱ्या अळीची अंडी नष्ट होते. • फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी निंबोळी अर्क ५%ची फवारणी करावी. • शेतीमध्ये प्रति एकरी ५-६ या प्रमाणात कामगंध सापळे लावावीत. • वेळोवेळी किडलेली फळे काढून आणि खोल खड्ड्यामध्ये गाडावीत. संदर्भ – शेतकरी मासिक जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
182
0
इतर लेख