गुरु ज्ञानAgrostar
फळ पक्वतेची लक्षणे जाणून घ्या!
🌱डाळिंबामध्ये फळे झाडावर पक्व होण्याआधीच तोडल्यास साठवणुकी दरम्यान पक्व होत नाहीत म्हणून पिकलेली फळे तोडणेच आवश्यक असते. डाळिंब फळे परिपक्व होण्यास साधारणपणे जातीपरत्वे फुलधारणेनंतर 135 ते 170 दिवसांचा कालावधी लागतो.
🌱फळे तोडणीयोग्य झाल्यावर त्याच्या सालीच्या रंगात फरक पडतो. उन्हाळ्यात पक्व झालेल्या फळांच्या सालीचा रंग गर्द
पिवळा असतो तर पावसाळ्यात व हिवाळ्यात तो गर्द तांबडा होतो. फळाचा गोलाकारपणा किंचित कमी होऊन चपटा आकार येतो. फळाच्या शेंड्याकडील पाकळ्या कोरड्या व कडक होऊन आतील बाजूने वळतात. फळातील दाण्यांचा रंगसुद्धा गडद तांबडा होऊन आतील दाणे लुसलुशीत, टपोरे, रसदार व चवीला गोड बनतात.
🌱संदर्भ:-Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.