AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळ तडकण्याच्या समस्येवर कोणता उपाय करावा?
गुरु ज्ञानAgrostar
फळ तडकण्याच्या समस्येवर कोणता उपाय करावा?
🌱सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कलिंगड आणि खरबूज या दोन्ही पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दोन्ही पिके कमी कालावधीत येणारी असून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात दोन्ही फळांना बाजारात मागणी असते. परंतु खरबूज आणि कलिंगड पिकाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना फळ विकासाच्या अवस्थेत फळे तडकण्याची समस्या येते. यामुळे फळांची गुणवत्ता ढासळून अशी फळे बाजारात विकली जात नाही. फळे तडकण्याची समस्या हि पिकास फळवस्थेत अनियमित पाणी नियोजन, वातावरणातील बदल आणि असंतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन या कारणांमुळे येते. 1.अनियमित पाण्याचे नियोजन - पिकास फळ अवस्थेत दोन पाण्यांमधील अंतर जास्त राहिले तर जमीन जास्त काळ कोरडी पडते. याचा परिणाम वेलींना पाणी कमी पडल्यामुळे फळांमधील पाणी बाष्पीभवनामुळे उडून जाऊ नये म्हणून फळांची साल घट्ट बनते. परंतु अश्या वेलींना पुढे अचानक जास्त पाणी दिल्याने वेली वेगाने पाणी शोषून घेतात व जास्त पाण्यामुळे फळांमध्ये दबाव निर्माण होऊन फळांच्या सालीवर तडे जातात. यामुळे फळांची गुणवत्ता खालावते. 2.वातावरणातील बदल - जास्त तापमान अथवा कमी तापमान, दिवस रात्रीच्या तापमानात जास्त तफावत आणि जास्त आद्रता यामुळे फळांच्या सालीवर आणि वाढीवर परिणाम होऊन फळांना तडे जातात. 3.असंतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन - पिकास कॅल्शिअम हे अन्नद्रव्ये कमी पडले तर फळांची साल मजबूत होत नाही तसेच कॅल्शिअम च्या कमतरतेमुळे बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा अभाव पिकात दिसून येतो परिणामी बोरॉन कमी पडल्याने फळांची साल कणखर होऊन तडे जातात. पोटॅश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळांची साल पातळ होते आणि फळांची गुणवत्ता ढासळते. 🌱यावर उपाययोजना म्हणून खालील पद्धतीने पिकाचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीतच कलिंगड व खरबूज पिकाची लागवड करावी. 🌱जमिनीत ओलावा टिकवून राहील अश्या पद्धतीने पाण्याचे नियमित नियोजन करावे शक्य असल्यास दोन्ही पिकांस ठिबक आणि मल्चिंग चा वापर करावा. 🌱पीक वाढीच्या अवस्थेपासून पिकास मुबलक प्रमाणात कॅल्शिअम, बोरॉन, पोटॅश यांसारख्या अन्नद्रव्यांचा वापर करावा. 🌱कॅल्शिअम आणि बोरॉन मुळे फळांची साल मजबूत व कठीण होते आणि फळांचा एकसारखा आकार होतो. कॅल्शिअम आणि बोरॉन साठी ॲग्रोस्टार नॅनोविटा CA 11 आणि नॅनोविटा B 10 चा वापर करावा. 🌱 पोटॅश या अन्नद्रव्यामुळे फळाची साल झाड होते तसेच फळाचा रंग, गोडवा, वजन आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. पोटॅश साठी ॲग्रोस्टार HD NPK 00:12:45 यासारख्या विद्राव्ये खताचा वापर करावा. वातावरणाचा ताण येऊ नये यासाठी पिकास ॲग्रोस्टार सिलिकॉन सारखे अन्नद्रव्ये फवारणीद्वारे वाढीच्या अवस्थेपासून वापरावे. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
0
इतर लेख