AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
फळबाग लागवड योजना सुरू!
➡️महाराष्ट्रात सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जाते. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरता दोन हेक्‍टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, ते भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत. ➡️हि योजना राज्यात राबविण्यास 2023 करीता सुरूवात होत असून, या योजनेत आता काही बदल करण्यात आलेले आहेत, याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे. ➡️संदर्भ: Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
27
21