AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फर्टिगेशन : वाटचाल आधुनिक शेतीकडे...
सल्लागार लेखकृषी जागरण
फर्टिगेशन : वाटचाल आधुनिक शेतीकडे...
ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60% ठिबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रात केले जाते व यातून पिकांना खते पुरविल्यास फर्टिगेशन हे शेतीसाठी वरदान मानले जाते . ही पद्धत सर्वप्रथम 1960 मध्ये इस्राएल मध्ये सुरू झाली व त्यांनतर 1970 मध्ये अरस्कॉट यांनी पहिला अहवाल सादर केला, ज्यामध्ये हातानी टाकण्याच्या खत पद्धतीपेक्षा सिंचनातून टाकलेल्या युरिया ची पध्दत ही अधिक लाभदायक व कार्यक्षम आढळून आली होती." आधुनिक शेती पध्दती मध्ये पाण्याची व खताची बचत करून थेंबा थेंबाने अथवा सुक्ष्म धारेने द्रवरूप/घनरूप खतामधील पोषक अन्नद्रव्ये पिकाला पुरवली जातात. विशेषतः फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फळ धारणाच्या वेळी, त्यानंतर फळांची वाढ होण्यासाठी अन्नद्रव्यांची अधिक मात्रा हवी असते अश्यावेळी फर्टिगेशन द्वारे दिलेली खते उपयोगी पडतात. या समस्येवर उपाय म्हणून पिकाला योग्य त्या वेळी संतुलित प्रमाणात पाण्याद्वारे विद्राव्य खते देने आवश्यक असते. ज्यामुळे अन्नद्रव्यांची पूर्तता करता येते ,पाण्याची व खताची बचत होते , पिकाला गरजे नुसार खत पाणी मिळाल्या मुळे पिकाची उगवण शक्ती पाठोपाठ पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढते हे साध्य करण्यासाठी फर्टिगेशन प्रक्रिया लाभदायक ठरते. फर्टिगेशन म्हणजे काय ? पिकाच्या मुळाशी गरजेनुसार ठिबक सिंचनातून योग्य अन्नद्रव्ये, खते व पाणी एकत्रितपणे देण्याच्या पद्धतीला फर्टिगेशन असे म्हणतात फर्टिगेशन चे फायदे:- 👉 द्रवरूप खते सिंचनातून दिली असता तीव्र द्रावण सौम्य होते. त्यामुळे पिकांच्या मुळावर अनिष्ट परिणाम होत नाही. 👉 द्रवरूप खतांच्या रूपाने मूख्य पोषणद्रव्याचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा केला जातो. 👉 पिकांच्या वाढीची अवस्था व त्यांच्या गरजेनुसार द्रवरूप खतांचा वापर केला असता उत्पादनात वाढ होते. 👉 सिंचनाद्वारे खते दिल्यास पिकांना पाणी पोषणद्रव्यांचा साठा मुळांजवळ होतो व पीक वाढीस वेग येतो. 👉 खते अनियमित आणि कमी प्रमाणात वापरल्यास जमिनीत अन्नद्रव्यांचा साठा कमी असतो आणि नियमित असतो. त्यामुळे अति पावसाचे निचऱ्याद्वारे किंवा जमिनीवरून जास्तीत जास्त पाणी न जाता खताची एकूण 25-30% बचत होते. 👉 कीटकनाशके व तणनाशके द्रवरूप खतात मिसळून दिल्याने मजूर ,यंत्रसामग्री व पर्यायाने आर्थिक बचत होते. 👉 हलक्या वालुकामय किंवा मुरमाड जमीनित पिकाचे उत्पादन येण्यासाठी खास व्यवस्थापणेची गरज असते. कारण जमिनीत पाणी व खत या दोन घटकांचा सहभाग महत्त्वाचा असतो द्रवरूप खतामुळे या समस्येचे निराकरण करता येते. फर्टिगेशन मुळे खतवापर कार्यक्षमता, पाणी वापर कार्यक्षमता व जमिनीचा सुपीकता वाढते व रोगांना बळी पडण्याचे प्रमाण थांबते. फर्टिगेशन करतांना घ्यावयाची दक्षता :- 1. ठिबक तोट्या / ड्रीपर्स मूख्य पाइपलाइन ला योग्य रीतीने जोडावेत. 2. ठिबक तोट्या/ ड्रीपर्स यामध्ये माती किंवा पालापाचोळा जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पिकाला नळ्यांचा त्रास होणार नाही एवढे अंतर ठेवावे. 3. ठिबक /सूक्ष्म सिंचन संचामध्ये खत शेवाळे, गंधक,लोह,किंवा इतर क्षार साचू देऊ नये,त्यामुळे उत्सर्जक/ठिबक तोट्या बंद पडतात, शेवाळ असल्यास क्लोरीन प्रक्रिया व रासायनिक अशुद्धता असल्यास आमल प्रक्रिया करावी. संदर्भ:- कृषी जागरण., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
9
इतर लेख