समाचारHello महाराष्ट्र
फक्त 55 रुपये गुंतवून मिळवा 36,000 रुपये!
➡️अशी सरकारी योजना जिथे तुम्हाला कमी गुंतवणूकीत दरमहा मोठी पेंशन मिळू शकेल. या योजनेची खास बाब म्हणजे सरकार यामध्ये आपल्याला पेन्शनची हमी देते. हि योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मन धन योजना. ही योजना पथ विक्रेते, रिक्षा चालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित असलेल्या इतर अनेक कामांमध्ये गुंतलेल्यांसाठी आहे.
५५ रुपये जमा करुन ३६,००० कसे मिळवायचे?
➡️उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या १८ व्या वर्षापासून पंतप्रधान श्रम योगी मन धन योजना सुरू केली तर त्याला दरमहा ५५ रुपये जमा करावे लागतील. त्याचबरोबर ४० व्या वर्षापासून ही योजना सुरू करणार्यास दरमहा २०० रुपये जमा करावे लागतील. वयाच्या ६० व्या वर्षांनंतर तुम्हाला पेन्शन मिळू शकेल. ६० वर्षानंतर तुम्हाला दरमहा ३००० रुपये म्हणजेच दर वर्षी ३६,००० रुपये पेन्शन मिळेल.
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
➡️आपण या योजनेत अर्ज करू इच्छित असल्यास आपल्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री श्रम योगीबंधन पेन्शन योजनेंतर्गत असंघटित क्षेत्राशी संबंधित कोणताही कामगार, ज्यांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी आहे आणि कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही, ते त्याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी अर्ज करणार्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे.
रजिस्ट्रेशन कसे करावे हे जाणून घ्या?
➡️कामगारांना या योजनेसाठी सामान्य सेवा केंद्रात (CSC) रजिस्ट्रेशन करावे लागेल. भारत सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. कामगार CSC केंद्रातील पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकतील.
➡️या केंद्रांद्वारे ऑनलाईन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल. रजिस्ट्रेशनसाठी, कामगारांना त्याचे आधार कार्ड, बचत किंवा जनधन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल.
संदर्भ:-Hello महाराष्ट्र,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.