AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फक्त 399 रुपयांत 10 लाखांचा विमा!
गुरु ज्ञानAgrostar
फक्त 399 रुपयांत 10 लाखांचा विमा!
➡️पोस्ट ऑफिस विभागामार्फत पोस्ट ऑफिस 399 विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या विमा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 399 रुपयांमध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट विभागाकडून दिला जाणार आहे. ही विमा पॉलिसी 18 वर्षाच्या पुढील व्यक्तींना काढता येईल आणि जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत याची मर्यादा असेल. ➡️या योजनेतून नागरिकांना फक्त 399 रुपयात एका वर्षासाठी 10 लाख रुपयापर्यंतचा विमा मिळू शकतो. सदर विमा योजनेत विमाधारकांचा अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचा आंशिक अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयापर्यंतच संरक्षण दिलं जातं. याशिवाय योजनेच्या माध्यमातून अपघातानंतर तातडीने रुग्णालयात दाखल झाल्यास 60,000 रुपयापर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरीच उपचार केल्यास 30,000 रुपयापर्यंतचा खर्चसुध्दा दिला जातो. ➡️पोस्ट पॉलिसी 399 पात्रता: - पॉलिसीधारक किंवा पॉलिसी घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती भारतीय असावा. - पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित व्यक्तीचा बचत खाते असावे. - पॉलिसीधारक व्यक्तींच वय 18 ते 65 या दरम्यान असावे. - या योजनेचा कालावधी 10 वर्षाचा असेल, याची पॉलिसीधारकांनी दक्षता घ्यावी. - सदर योजनेसाठी पॉलिसीधारकांना प्रति वर्ष 399 रु. इतकी रक्कम भरावी लागेल. -- पोस्ट ऑफिस विमा योजना 399 साठी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन प्रक्रिया इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून देण्यात आलेली नाही, त्यामुळे ज्या अर्जदारांना या योजनेचा किंवा या पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी जवळील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत संपर्क साधावा. त्याठिकाणी सर्व आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जाईल व पॉलिसीधारकांचा 399 प्लॅन चालू करण्यात येईल. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
7