AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फक्त 14 दिवसात बनणार केसीसी कार्ड!
समाचारAgrostar
फक्त 14 दिवसात बनणार केसीसी कार्ड!
➡️शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्जही उपलब्ध करुन देत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी मिशन मोड अंतर्गत मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेला KCC सॅच्युरेशन ड्राइव्ह असे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच आता पात्र शेतकरी KCC बनवून स्वस्त दरात कर्ज मिळवू शकतात. ➡️आता फक्त 14 दिवसात किसान क्रेजीट कार्ड मिळणार आहे. ह कार्ड काढण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची वेळ आहे. KCC अंतर्गत पीएम किसान लाभार्थ्यांच्या कव्हरेजसाठी सीसी सॅचुरेशन ड्राइव्ह मोहीम सुरू करण्यात आली आहे. पीएम किसानच्या सर्व लाभार्थ्यांना KCC अंतर्गत कर्ज मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ➡️खरं तर, KCC अंतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनासाठी व्याजावर सवलत मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र मत्स्यपालन आणि पशुसंवर्धनासाठी तीन लाखांऐवजी केवळ दोन लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. ➡️जर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड 14 दिवसांच्या आत बनवायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी लवकर अर्ज करावा लागेल. अर्ज करताना बँक तुमच्याकडून फक्त कागदपत्रे मागवेल. प्रथम, शेतीची कागदपत्रे, दुसरे, रहिवासी प्रमाणपत्र आणि तिसरे, अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र. विशेष म्हणजे अर्ज करताना फक्त एक पानाचा फॉर्म भरावा लागेल. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
3
इतर लेख