AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फक्त 10 हजार रु. मध्ये घरी आणा इलेक्ट्रिक स्कूटर !
कृषि यांत्रिकरणAgrostar
फक्त 10 हजार रु. मध्ये घरी आणा इलेक्ट्रिक स्कूटर !
🛵सध्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटर्स खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशातच आता जे ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटर्स खरेदी करू इच्छुक आहेत अशा ग्राहकांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर्स खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय मार्केटमध्ये आला आहे. सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री करणारी कंपनी "Hero Electric" च्या स्कूटरसाठी फायनान्स सेवा सुरू करू शकणार आहेत. यामुळे इच्छूक ग्राहक थोडे डाउन पेमेंट करून फायनान्स करू शकतील. 🛵हिरो इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्ये : हिरो इलेक्ट्रिक एट्रिया एलएक्स ची ​​किंमत 71,690 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. उत्कृष्ट लूक आणि वैशिष्ट्यांसह या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी रेंज 85 किमी पर्यंत आहे आणि कमाल वेग 25 किमी प्रतितास आहे. त्याच वेळी,हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश एलएक्स ची ​​किंमत 59,640 रुपये आहे. 🛵याची बॅटरी एका चार्जवर 85 किमी पर्यंत चालणार आहे आणि कमाल वेग 25 किमी प्रतितास आहे. आता या दोन्ही स्कूटरवर उपलब्ध असलेल्या कर्जाची माहिती जाणून घेवूया. 🛵24 महिन्यांसाठी 2,790 रुपये ईएमआय : जर तुम्हाला हिरो इलेक्ट्रिक च्या एट्रिया एलएक्स मॉडेलला फायनान्स करायचे असेल, तर ते अगदी सोपे आहे, जिथे तुम्ही फक्त रु. 10,000 चे डाउन पेमेंट करूनही ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी नेऊ शकता. त्याची किंमत 71,690 रुपये आहे. 🛵10,000 डाउनपेमेंट केल्यानंतर, तुम्हाला 2 वर्षांसाठी 8% व्याजदराने 61,690 रुपये कर्ज मिळेल आणि त्यानंतर पुढील 24 महिन्यांसाठी, तुम्हाला सुमारे 2,790 रुपये ईएमआय, म्हणजे मासिक हप्ता म्हणून भरावे लागतील. 🛵मासिक ईएमआय आणि व्याज : हिरो इलेक्ट्रिक कंपनीच्या या स्कूटर मॉडेलची किंमत 59,640 रुपये (एक्स-शोरूम) आहे. जर तुम्ही फायनान्स केले तर हे खूप सोपे आहे, जिथे तुम्हाला फक्त 10,000 रुपये डाउन पेमेंट म्हणून भरावे लागेल. 🛵यासाठी तुम्हाला 49,640 रुपये कर्ज मिळेल, ज्याचा कालावधी 2 वर्षांपर्यंत असेल आणि व्याज दर 8% असेल. यानंतर, तुम्हाला पुढील 2 वर्षांसाठी दरमहा 2,245 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. 🛵 संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
73
8
इतर लेख