AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फक्त १५६ रुपयांत कोरोनावर उपचार; या योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंतचा खर्च मिळणार!
कृषी वार्तान्यूज १८लोकमत
फक्त १५६ रुपयांत कोरोनावर उपचार; या योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंतचा खर्च मिळणार!
देशभरात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढते आहे. अशात जर तुम्ही कोरोनाग्रस्त आहात आणि त्यावरील उपचारासाठीच्या खर्चाबाबत काळजीत असाल, तर टेन्शन घेण्याची गरज नाही. देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोनाच्या खर्चासाठी एक स्किम आणली आहे, ज्याचा केवळ १५६ ​रुपयांत फायदा घेता येऊ शकतो. बँकेच्या या योजनेचं नाव कोरोना रक्षक पॉलिसी असं आहे. SBI कोरोना रक्षक पॉलिसी - - SBI ची कोरोना रक्षक पॉलिसी एक आरोग्य विमा संरक्षण योजना आहे. - भारतीय स्टेट बँकेची ही कोविड पॉलिसी कोणत्याही मेडिकल टेस्टशिवाय जारी केली जाते. - येथे १०० टक्के कव्हर दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. - कोरोना रक्षक पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा १८ वर्ष आहे. - कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये कमीत कमी प्रीमियम १५६ रुपये आणि अधिकाधिक २२३० रुपये इतका आहे. - या पॉलिसीमध्ये १०५ दिवस, १९५ दिवस आणि २८५ दिवसांचा अवधी आहे. - स्टेट बँकेच्या या पॉलिसीमध्ये कमीत कमी ५० हजार आणि जास्तीत जास्त २ लाख ५० हजारांचा कव्हर मिळतो. - या पॉलिसीच्या अधिक माहितीसाठी ०२२-२७५९९९०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. - तसंच https://www.sbilife.co.in/en/individual-life-insurance/traditional/corona-rakshak या अधिकृत लिंकवरुनही अधिक माहिती घेता येईल. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -न्यूज १८लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
65
29
इतर लेख