AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फक्त एकदा १०लाखांची गुंतवणूक, मिळेल महिन्याला मोठी कमाई!
व्यवसाय कल्पनालोकमत
फक्त एकदा १०लाखांची गुंतवणूक, मिळेल महिन्याला मोठी कमाई!
➡️ जर तुम्हाला नोकरी करायची नसेल किंवा तुम्हाला घरी बसून अधिक पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी शेती हा एक चांगला पर्याय असू शकतो. ज्यामुळे तुम्ही अल्पावधीत लखपती बनू शकता. हा शेतीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकदाच 10-15 लाख रुपये गुंतवावे लागतील, त्यानंतर तुम्ही दरमहा 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. सुरू करा शेती व्यवसाय भारतातील अनेक राज्यांमध्ये शेवग्याच्या शेगांची शेती केली जाते. त्यात अनेक प्रकारचे मल्टी-व्हिटॅमिन, प्रथिने, अमीनो अॅसिड असतात. आरोग्य पूरक स्वरूपात त्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून देशात वाढली आहे. अनेक स्टार्टअप्स शेवग्यावर प्रक्रिया करून नवीन निरोगी उत्पादने तयार करीत आहेत. महाराष्ट्रातील रहिवासी प्रमोद पानसरे सुद्धा हाच व्यवसाय करीत आहेत. गेली दोन वर्षे शेवग्याची पाने आणि हळदीच्या मदतीने ते चॉकलेट, चिक्की, खाखरा आणि स्नॅक्स बनवून देशभर मार्केटिंग करत आहेत. सध्या ते दरमहा तीन लाख रुपयांचा व्यवसाय करीत आहे. कसा करतात याचा व्यवसाय? एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रमोद यांनी या व्यवसायात 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि एक कार्यालय उघडले. त्यानंतर फूड परवान्यासह आवश्यक कागदपत्रे गोळा केली आणि व्यवसाय सुरू केला. प्रमोद यांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही आरोग्यदायी गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली. यामुळे व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यात आम्हाला खूप मदत झाली. आमच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे.' जाणून घ्या कशी करतात मार्केटिंग? प्रमोद यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला ते स्टॉल्स लावून आपली उत्पादने बाजारात आणत असत. नंतर जेव्हा त्या उत्पादनाची मागणी वाढू लागली, तेव्हा किरकोळ विक्रेते आणि मोठ्या घाऊक विक्रेत्यांशी संपर्क साधून मार्केटिंग सुरू झाले. प्रमोशनसाठी सोशल मीडियाचीही मदत घेतली. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0