AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फक्त एकदाच करा पेमेंट आणि आयुष्यभर मिळेल पेंशन!
कृषी वार्ताTV9 Marathi
फक्त एकदाच करा पेमेंट आणि आयुष्यभर मिळेल पेंशन!
➡️ ही सिंगल प्रीमियम पेन्शन योजना आहे, म्हणजेच पॉलिसी घेताना तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर पेन्शन मिळते. ➡️ सरल पेन्शन योजना 1 एप्रिल 2021 पासून सुरु झाली आहे. विमा नियामक आयआरडीएआय(IRDAI)ने सर्व विमा कंपन्यांना एक स्टँडर्ड एन्युटी प्रोडक्ट आणण्यास सांगितले होते. ज्याचे नियम व अटी एकसमान, पारदर्शक आणि सोप्या असाव्यात. आता हे प्रोडक्ट बाजारात दाखल झाले आहे. वास्तविक, विमा कंपन्या विमा पॉलिसी आणि पेन्शन योजना वेगवेगळ्या नावाने विकतात. सामान्य व्यक्तीला त्यांच्या विविध कठिण अटी समजत नाहीत आणि ते मिससेलिंगचे शिकार होतात. म्हणूनच, आयआरडीएआयने असे प्रोडक्ट आणण्याचा विचार केला जे कोणतीही कंपनी ते विकले तरीसुद्धा त्याचे नियम, वैशिष्ट्ये आणि फायदे नेहमी समान असतील. याला सरल पेन्शन योजना असे म्हणतात. तथापि, विमा कंपन्या स्वतंत्रपणे प्रीमियम घेऊ शकतात. सरल पेन्शन योजना म्हणजे काय? ➡️ ही सिंगल प्रीमियम पेन्शन योजना आहे, म्हणजेच पॉलिसी घेताना तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर पेन्शन मिळते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, सिंगल प्रीमियमची रक्कम त्याच्या / तिच्या नॉमिनीला परत केली जाते. सरल पेंशन योजना ही एक इंटरमिजिएट एन्युटी योजना आहे, म्हणजेच पॉलिसी घेताच आपल्याला पेन्शन मिळणे सुरू होते. ही पॉलिसी घेतल्यानंतर जितक्या पेन्शनपासून सुरुवात होते तितकीच पेन्शन पूर्ण आयुष्य मिळते. या पेन्शन योजनेचे दोन प्रकार ➡️ सिंगल लाईफ – यात पॉलिसी एका व्यक्तीच्या नावे असेल, जोपर्यंत पेन्शनर जिवंत राहील तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळेल, त्याच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाईल. ➡️ जॉईंट लाईफ – यात दोन्ही पार्टनरचे कव्हरेज आहे. जोपर्यंत प्राथमिक पेंशनधारक जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळणारच आहे. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या जोडीदारास आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे, त्याच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला देण्यात येईल. कोण घेऊ शकेल सरल पेन्शन योजनेचा लाभ? ➡️ या योजनेचा भाग होण्यासाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आणि कमाल 80 वर्षे आहे. ही संपूर्ण आयुष्यासाठी पॉलिसी असल्याने, पेंशनधारी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत पेन्शन संपूर्ण आयुष्यभर मिळेल. सरल पेन्शन पॉलिसी सुरु होण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते. पेन्शन कधी मिळणार? ➡️ पेंशन केव्हा मिळणार हे पेंशन धारकालाच ठरवायचे आहे. यात तुम्हाला 4 पर्याय मिळतील. आपण दरमहा पेन्शन घेऊ शकता, दर तीन महिन्यांनी घेऊ शकता, दर 6 महिन्यांनी किंवा 12 महिन्यांत एकदा घेऊ शकता. आपण जो पर्याय निवडाल, त्या काळात आपली पेन्शन येणे सुरू होईल. किती पेन्शन मिळेल? ➡️ आता प्रश्न उद्भवतो की या सरल पेन्शन योजनेसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील, तर हे आपल्यालाच निवडावे लागेल. म्हणजेच आपण ज्या रकमेची पेन्शन निवडाल त्यानुसार पैसे द्यावे लागतील. तुम्हाला दरमहा पेन्शन पाहिजे असल्यास किमान 1000 रुपये पेन्शन घ्यावी लागेल, तीन महिन्यांसाठी 3000 रुपये, 6 महिन्यांसाठी 6000 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 12000 रुपये पेन्शन घ्यावी लागेल. कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा नाही. कर्जही घेऊ शकता ➡️ आपल्याला गंभीर आजार असल्यास आणि उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्यास आपण सरल पेन्शन योजनेत जमा केलेली रक्कम काढू शकता. आपल्याला गंभीर आजारांची यादी दिली आहे, ज्यासाठी आपण पैसे काढू शकता. पॉलिसी सरेंडर केल्यावर बेस प्राईझच्या 95% हिस्सा रिटर्न दिला जातो. या योजनेंतर्गत (सरल पेन्शन योजना) कर्ज घेण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. योजना सुरु झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
7
इतर लेख