AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फक्त आधार कार्ड द्वारे मिळवा LPG कनेक्शन; अनुदान सुद्धा मिळेल!
समाचारलोकमत
फक्त आधार कार्ड द्वारे मिळवा LPG कनेक्शन; अनुदान सुद्धा मिळेल!
➡️एलपीजी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडची गॅस कंपनी इंडेनने ग्राहकांसाठी मोठी सुविधा जाहीर केली आहे. ➡️ इंडेनच्या माहितीनुसार, आता कोणताही ग्राहक फक्त त्याचे आधार कार्ड दाखवून त्वरित एलपीजी कनेक्शन मिळवू शकतो. गॅस कनेक्शनसाठी, ग्राहकाला आधार कार्डव्यतिरिक्त इतर कोणतेही डॉक्युमेंट देण्याची आवश्यकता नाही. ➡️नवीन शहरात एलपीजी कनेक्शन घेणाऱ्यांसाठी ही मोठी सुविधा असणार आहे. कारण गॅस कंपन्या अनेक प्रकारचे डॉक्युमेंट मागतात. विशेषतः पत्ता पुरावा देणे बंधनकारक आहे. शहरांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडे पत्त्याचा पुरावा नाही. यामुळे त्यांना एलपीजी कनेक्शन मिळण्यात अडचणी येतात. परंतु अशा ग्राहकांना आता सहजपणे सिलिंडर मिळणार आहे. इंडेनकडून माहिती ➡️या नवीन आणि विशेष सुविधेबद्दल इंडेनने माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, 'कोणतीही व्यक्ती आधार दाखवून नवीन एलपीजी कनेक्शन घेऊ शकते. त्याला सुरुवातीला विनाअनुदानित कनेक्शन दिले जाईल. ग्राहक नंतर पत्ता पुरावा सादर करू शकतो. हा पुरावा सादर होताच सिलिंडरवरील अनुदानाचा लाभही दिला जाईल. ➡️म्हणजेच जे कनेक्शन आधार आणि पत्त्याच्या पुराव्यासह घेतले जाईल, ते सरकारी अनुदानाच्या लाभाखाली येईल. जर एखाद्या ग्राहकाला लवकरच कनेक्शन मिळवायचे असेल आणि त्याच्याकडे पत्त्याचा पुरावा नसेल, तर तो लगेच आधार क्रमांकाद्वारे या सुविधेचा हक्कदार होईल. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
6
इतर लेख