AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे?
योजना व अनुदानAgrostar
प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे?
➡️पंतप्रधान यांनी 22 जानेवारी रोजी ‘प्रधानमंत्री सूर्योदय’ योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसविण्याबाबतची ही पहिलीच योजना नाही. त्यापूर्वी भारत सरकारने 2014 मध्ये अशाच प्रकारची एक योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत 2022 पर्यंत 40 गीगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, हे लक्ष्य अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ही मुदत 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशातच पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली ‘सूर्योदय’ योजना हे लक्ष्य पूर्ण करण्याचाच एक भाग असल्याचे दिसून येते. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली ‘सूर्योदय’ योजना नेमकी काय आहे? भारताची सध्याची सौरऊर्जा निर्मिती क्षमता किती? आणि सौरऊर्जा निर्मिती भारतासाठी महत्त्वाची का? ➡️‘प्रधानमंत्री सूर्योदय’ योजना नेमकी काय आहे? या योजनेंतर्गत एक कोटी ग्राहकांच्या घरांवर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे. या योजनेमुळे देशातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांचे विजेचे बिल कमी होईल. तसेच ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे भारताचे उद्दिष्टही साध्य होईल. ➡️भारताची सध्याची सौरऊर्जा निर्मिती क्षमता किती आहे? भारताची सौरऊर्जा निर्मिती क्षमता 73.31 गीगावॉट इतकी आहे. त्याबरोबरच ‘रूफटॉप सौरउर्जा निर्मिती क्षमता’ म्हणजे घराच्या छतांवर लावण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रणालीद्वारे सौरऊर्जा निर्मितीची क्षमता 11.8 गीगावॉट इतकी आहे. विशेष म्हणजे देशातील सध्याच्या अक्षय ऊर्जानिर्मितीमध्ये सौरऊर्जेचा वाटा सर्वाधिक आहे. ➡️भारतासाठी सौरऊर्जा निर्मिती महत्त्वाची का? इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार, आगामी 30 वर्षात भारतात ऊर्जेच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला एक शाश्वत ऊर्जेचा स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. भारत केवळ कोळशाद्वारे निर्मित ऊर्जेवर अवलंबून राहू शकत नाही.त्यामुळे सौरऊर्जा निर्मिती क्षमता वाढवणे आवश्यक आहे. ➡️ संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
79
0
इतर लेख