AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना!
योजना व अनुदानAgrostar
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना!
☑️प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे. हि योजना वीट भट्टी कामगार, घरगुती नोकर, रिक्षाचालक, मजूर, शिंपी, मोची इत्यादी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरू केलेली आहे. मासिक उत्पन्न १५,०००/- रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ☑️या योजनेअंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर लाभार्थ्यांना प्रतिमहा पेन्शन देण्यात येणार आहे. ही पेन्शन दरमहा ३,०००/- रुपये दिली जाईल. आत्तापर्यंत ४४.९० लाखांहून अधिक कामगारांनी नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दरमहा गुंतवणूक करावी लागणार आहे. गुंतवणूकीची रक्कम ही वयाच्या आधारावर निश्चित केली जाईल. ही रक्कम ५५/- रुपयांपासून २००/- रुपयांपर्यंत असेल. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत अंदाजे १० कोटी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. ☑️पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची उद्दिष्ट : PMSYM योजनेचे मुख्य उद्दिष्ट असंघटीत क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन देऊन या योजनेद्वारे त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे. तसेच वृद्धापकाळात त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेअंतर्गत त्यांना स्वावलंबी व सशक्त बनवणे. ☑️ अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : ➖ बँक खाते पासबुक ➖ मोबाईल नंबर ➖ आधार कार्ड ➖ मतदान ओळखपत्र ➖ पासपोर्ट आकाराचे फोटो ☑️अर्ज करण्याची पद्धत: ➖ इच्छुक अर्जदाराला सर्वप्रथम प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रांसह जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रांमध्ये जावे लागेल. ➖ यानंतर अर्जदाराला आपली सर्व कागदपत्रे सीएससी अधिकाऱ्याला द्यावी लागतील. ➖ यानंतर सीएससी अधिकारी एजंट तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चा ऑनलाईन फॉर्म भरेल. ➖ अर्ज भरून झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट तुम्हाला देईल. ➖या अर्जाची प्रिंट आउट तुम्ही तुमच्याकडे भविष्यासाठी सुरक्षित ठेवा. ➖अशाप्रकारे तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची साठीचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होईल. ☑️प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा हेल्पलाइन नंबर – ➖ई-मेल आईडी – vyapari@gov.in | shramyogi@nic.in ➖हेल्पलाईन नंबर -1800 267 6888 ☑️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
7
इतर लेख