योजना व अनुदानmarathit mahiti
प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजना माहिती!
➡️ प्रधानमंत्री ग्रामीण उजाला ही योजना पंतप्रधान यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी सुरू केली आहे.
➡️ या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विजेची कार्यक्षमता वाढवणे आणि जनसामान्य लोकांना वीजबिल कमी करून उत्पन्नामध्ये वाढ करणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट्य आहे.
➡️ ही योजना सुरुवातीला पाच महानगरांमध्ये सुरू केली आहे. प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना प्रत्येकी दहा रुपये दराने चार ते पाच एलईडी बल्ब देण्यात येते..
➡️ या योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागातील १५ ते २० कोटी लाभार्थ्यांना प्रति बल्ब १० रुपये दराने ७ वॅट आणि १० वॅट चे बल्ब दिले जातील.
➡️ पंतप्रधान ग्रामीण उजाला योजनेच्या माध्यमातून एलईडी बल्बच्या मागणीला वेग येईल, ज्यामुळे गुंतवणूक वाढेल.
➡️ पहिल्या टप्प्यात बिहारमधील आरा, महाराष्ट्रातील नागपूर, गुजरातमधील वडनगर आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा ग्रामीण भागात ही योजना सुरू झाली.
➡️ प्रधान मंत्री ग्रामीण उजाला योजनेचे ग्रामीण भागात एलईडी बल्ब पोहोचवून ९३२५ कोटी युनिट्स वार्षिक वीज बचत करणे हे लक्ष्य आहे.
प्रधान मंत्री ग्रामीण उजाला योजना - पात्रता निकष
➡️ केवळ भारतातील नागरिकच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
मोफत एलईडी बल्ब योजनेंतर्गत केवळ भारतातील ग्रामीण भागातील लोकांना फायदा होणार आहे.
➡️ वीज वितरण कंपनीचे ग्राहक असलेल्या सर्व घरगुती कुटुंबांना या प्रधान मंत्री ग्रामीण उजाला योजना 2021 अंतर्गत लाभ देण्यात येईल, हे सर्व या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
1)रहिवासी पुरावा
2)आधार कार्ड
3)मोबाइल नंबर
4)उजाला एलईडी खरेदी करताना ग्राहकांना खालील कागदपत्रे सोबत घ्यावी लागतात
ईएमआय साठी - नवीन वीज बिलाची प्रत आणि सरकारी अधिकृत आयडी पुराव्याची प्रत
5)प्रधानमंत्री ग्रामीण उजाला योजनेसाठी अर्ज कसा करावा?
ऑफलाईन अर्ज -
Official वेबसाईट - http://ujala.gov.in
संदर्भ:-marathit mahiti
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.