क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताTV9
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नेमकी काय? लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?
👉राज्यातले शेतकरी आता आधुनिक शेतीचा पर्याय स्वीकारत आहेत. शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शेतीला जलसिंचन करणं हे शेतकऱ्यांपुढील मोठं काम असतं. पारंपारिक पद्धतीनं पाणी दिल्यास इंधन, वेळ आणि पाण्याचा अपव्यय होतो. केंद्र आणि राज्य सरकार शेतीमध्ये सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर व्हावा म्हणून प्रयत्न करत आहे. सरकारकडून ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन्ही पद्धतींचा पुरस्कार करण्यात येतो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाते. कोणते शेतकरी अर्ज करु शकतात ? 👉शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा असावा. शेतकरी अनुसूचित. जाती , अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. २०१६-१७ पूर्वी एखा्द्या शेतकऱ्यानं एखाद्या सर्व्हेनंबरसाठी लाभ घेतला असल्यास पुढील १० वर्ष तर २०१७-१८ लाभ घेतला असल्यास पुढील ७ वर्ष त्या सर्व्हे नंबरवर योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्याकडं कायम स्वरुपी वीज कनेक्शन असावं. सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनधींनी तयार केलेली असावी. ५ हेक्टरच्या मर्यादेतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी ५५ टक्के तर, इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान मिळते. आवश्यक कागदपत्रे १) आधार कार्ड २) ७/१२ उतारा ३) ८ अ दाखला ४) वीज बिल ५) खरेदी केलेल्या संचाचं बिल ६) जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी ) ७) स्वयं घोषणापत्र ८) पूर्वसंमती पत्र ऑनलाईन अर्ज कसा करावा? प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी शेतकरी योजनावर क्लिक करावे. पुढे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निवडावी. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी पहिल्यांदा नोंदणी करण्यासाठी नवीन वापरकर्ता नोंदणीवर क्लिक करा. पुढे शेतकऱ्यांनी त्यांचं नाव टाकावे, युजर नेम आणि पासवर्ड टाकून महाडीबीटीवर लॉगीन तयार करा त्यासाठी शेतकऱ्याकडे ईमेल आयडी असणं बंधनकारक असून त्यांचं आणि मोबाईल नंबंरचं व्हेरिफिकेशन करावं लागते. लॉगीन करुन अर्ज भरावा लागेल. लॉगीन केल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकून आधार प्रमाणीकरण करुन घ्या. शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती, शेती जमिनीची माहिती भरा. 👉महाडीबीटी पोर्टलवरुन विविध शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक शेतकरी-एक अर्ज या पद्धतीद्वारे एकचं अर्ज करणं अपेक्षित आहे. त्यामुळे दुसरा अर्ज करता येणार नाही. परंतु पहिला अर्ज रद्द करुन पसंतीच्या सर्व बाबींसाठी पुन्हा नव्यानं एकच अर्ज करता येईल. त्यासाठी पहिला अर्ज रद्द करावा लागेल. संदर्भ -TV9, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
84
22
संबंधित लेख