योजना व अनुदान न्यूज १८ लोकमत
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जावर सबसिडी!
➡️आता गृहकर्जाची रक्कम वाढवून शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही प्रधानमंत्री आवास योजनाच्या कक्षेत आणण्यात आले आहे. सुरुवातीच्या तरतुदींनुसार, प्रधानमंत्री आवास योजनामधील गृहकर्जाची रक्कम रु. ३ ते ६ लाखांपर्यंत होती, ज्यावर प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत व्याज अनुदान दिले जात होते. आता ती वाढवून आता १८ लाख रुपये करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनामध्ये किती सबसिडी मिळेल? ➡️६.५ टक्के क्रेडिट लिंक्ड सबसिडी फक्त ६ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर उपलब्ध आहे. प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत सरकारी अनुदानाची रक्कम ➡️प्रधानमंत्री आवास योजनाध्ये, व्याज अनुदान हे व्याजाच्या रकमेतील (वास्तविक आणि मिळालेले अनुदान) फरक असणार नाही. हे व्याज अनुदानाच्या रकमेचे निव्वळ वर्तमान मूल्य (NPV) असेल. पीएमएवाय सबसिडीचा लाभ कसा मिळवायचा? 1) तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज आधी सेंट्रल नोडल एजन्सीला पाठवला जाईल. मंजूर झाल्यास, एजन्सी अनुदानाची रक्कम कर्ज देणाऱ्या बँकेला देईल. ही रक्कम तुमच्या कर्ज खात्यात येईल. 2) जर तुमचे वार्षिक उत्पन्न ७ लाख असेल आणि कर्जाची रक्कम ९ लाख असेल तर तुमची सबसिडी २.३५ ​लाख रुपये असेल. 3) हे वजा केल्यावर तुमच्या कर्जाची रक्कम ६.६५ लाख रुपये होईल. या रकमेवर तुम्ही मासिक हप्ता भराल. 4) कर्जाची रक्कम तुमच्या सबसिडीच्या पात्रते पेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला अतिरिक्त रकमेवर सामान्य दराने व्याज द्यावे लागेल. PMAY: ऑनलाइन अर्ज कसा करावा? प्रधान मंत्री आवास योजनेच्या http://pmaymis.gov.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
16
5
इतर लेख