AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
प्रत्येक महिन्याला केवळ ८०० रुपये गुंतवा अन् 5 लाख मिळवा!
कृषी वार्ताtv9marathi
प्रत्येक महिन्याला केवळ ८०० रुपये गुंतवा अन् 5 लाख मिळवा!
➡️ सुरक्षितपणे पैशांची गुंतवणूक करण्यासाठी एलआयसीच्या पॉलिसी अधिक चांगल्या मानल्या जातात. तुम्हाला कमी प्रीमियम देऊन मॅच्युरिटीवर ५ लाखांहून अधिक पैसे मिळवायचे असतील तर एलआयसीची जीवन लाभ ही एक चांगली पॉलिसी आहे. ➡️ यामध्ये दरमहा अवघ्या ८०० रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. या व्यतिरिक्त पॉलिसीमध्ये मृत्यूनंतरचा दावा, बोनस आणि इतर गोष्टी देखील उपलब्ध आहेत. ➡️ एलआयसी जीवन लाभ पॉलिसीअंतर्गत कंपनी पॉलिसीधारकांना बोनस देते.एलआयसी जीवन लाभ पॉलिसीअंतर्गत कंपनी पॉलिसीधारकांना बोनस देते. ८ वर्ष ते ५४ वर्षे वयोगटातील लोक या पॉलिसीत गुंतवणूक करू शकतात. पॉलिसीच्या नियमांनुसार, ५४ वर्षांच्या व्यक्तीने ते घेतल्यास पॉलिसीचा जास्तीत जास्त कालावधी २१ वर्षे असेल. किमान दोन लाख रुपयांची सम एश्योर्ड रक्कमही असते. जास्तीत जास्त रकमेची मर्यादा नाही. पॉलिसी किती वर्षे असेल? ➡️ एलआयसी जीवन लाभ पॉलिसी तीन पर्यायांमध्ये आहे. ज्यामध्ये १६वर्षे, २१ वर्षे आणि २५ वर्षांचा समावेश आहे. या अवधीसाठी तुम्हाला अनुक्रमे १०, १५ आणि १६ वर्षे प्रीमियम द्यावे लागतील. परंतु पॉलिसीची मुदत संपल्यानंतरच तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम मिळेल. उदाहरणार्थ, जर आपले वय ३० वर्षे असेल आणि आपण २ लाख रुपयांची विमा रक्कम खरेदी केली, तर पॉलिसीची मुदत २५ वर्षे असेल. पॉलिसीचे फायदे ➡️ एलआयसीच्या या पॉलिसीत गुंतवणूकदारास अपघाती मृत्यू आणि अपंगत्व, अपघात लाभ, नवीन मुदतीची हमी आणि नवीन गंभीर आजार रायडर बेनिफिट मिळतो. म्हणजेच जर पॉलिसीधारक एखाद्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग झाला असेल तर कंपनी यासाठी आर्थिक मदत करणार आहे. हा दावा गुंतवणूकदाराव्यतिरिक्त नामनिर्देशित व्यक्ती करू शकतो. यामध्ये बोनसचा फायदा देखील आहे. यामध्ये तुम्हाला १००० रुपयांवर प्रति ४७ रुपये बोनस मिळेल. ५.२५ लाख रुपये कसे मिळवायचे? ➡️ जर आपण एलआयसीची वयाच्या ३० ​व्या वर्षी जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास आणि विमा रक्कम २ लाख रुपयांची असल्यास पॉलिसीची मुदत २५ वर्षे असेल. अशा वेळी तुम्हाला दरमहा सुमारे ८०० रुपये प्रीमियम भरावा लागतो. तुमची एकूण गुंतवणूक दीड लाख रुपये असेल. तुम्हाला १००० रुपयांवर प्रति ४७ रुपये बोनस मिळेल. २५ वर्षांत तुमची एकूण बोनस रक्कम २.३५ लाख असेल. ➡️ या व्यतिरिक्त मॅच्युरिटीवर अंतिम अतिरिक्त बोनस म्हणून आपल्याला ९०००० रुपये मिळतील, कारण एलआयसी प्रति एक हजारावर ४५० रुपये बोनस देते. अशा प्रकारे तुम्हाला एकूण ५.२५ लाख रुपये मिळतील. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -TV9 Marathi, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
20
6
इतर लेख