AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
प्रतीक्षा संपली! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार 4000 रुपये!
कृषी वार्ताIndia. Com
प्रतीक्षा संपली! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार 4000 रुपये!
➡️पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर शेतकरी 10व्या हप्त्याची वाट पाहत असतील तर १५ डिसेंबरला १० व्या हप्त्याचे २,००० रुपये खात्यात जमा होणार आहेत. याचा अर्थ असा की सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचे २,००० रुपये हस्तांतरित करणार आहे. या दिवशी जमा होणार १० वा हप्ता, काही शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये, जाणून घ्या. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ४००० रुपये ➡️ज्या शेतकर्‍यांना अजून ९व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र जमा होतील. म्हणजेच अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४००० रुपये खात्यात जमा होतील. पैसे मिळतील की नाही कसे तपासायचे? ➡️पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल तर तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यादीत असे तपासा तुमचे नाव ➡️सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल. ➡️तेथे होमपेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर असा पर्याय दिसेल. ➡️फार्मर्स कॉर्नर सेक्शनमध्ये तुम्हाला Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ➡️त्यानंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. ➡️यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. अशी तपासा हप्त्याची स्थिती. ➡️वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा. यानंतर Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. आता तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- India. Com, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
100
17
इतर लेख