AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
प्रति महा फक्त 1 रुपया गुंतवून मिळतोय 2 लाखांचा विमा!
कृषी वार्ताtv9marathi
प्रति महा फक्त 1 रुपया गुंतवून मिळतोय 2 लाखांचा विमा!
➡️ कोरोनाच्या संकटात आरोग्य विम्याचे महत्त्व लोकांना अधोरेखित झालेय. याचा परिणाम म्हणजे मे महिन्यात आरोग्य विम्यात आतापर्यंत केवळ 57 टक्के वाढ नोंदविण्यात आली. केवळ खासगी कंपन्याच नव्हे तर लोकांच्या आरोग्याच्या चांगल्या सुविधांसाठी मोदी सरकारने 2015 पासून 'प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना' योजना लागू केली. देशातील मागासवर्गीयांना आरोग्य संरक्षण पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे सरकारने प्रीमियमही नाममात्र ठेवले आहे. मोदी सरकारच्या या योजनेचे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा विमा योजना:- ➡️ मोदी सरकारच्या या योजनेचे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा विमा योजना असे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील निम्न उत्पन्न गटातील लोकांना फायदा होत आहे. या सरकारी योजनेचा प्रीमियम संपूर्ण वर्षासाठी केवळ 12 रुपये आहे, म्हणजे महिन्याचे फक्त 1 रुपये. या योजनेद्वारे सरकार गरीब आणि गरजूंना कठीण काळात विमा सुविधा प्रदान करते. कोरोना कालावधीत येणार कामी:- ➡️ कोरोना काळात केंद्र सरकारची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. PMSBY अंतर्गत विमा सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून कमी उत्पन्न गटांनाही खर्च न करता उपचार मिळू शकतील. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची प्रीमियम रक्कम खातेधारकाच्या बचत खात्यातून बँकांकडून ऑटो डेबिट सुविधेद्वारे जमा केली जाते. कोणतीही व्यक्ती केवळ एका बचत खात्याद्वारे या योजनेस पात्र असेल. महिन्याला 1 रुपयांत 2 लाखांचा विमा:- ➡️ 18-70 वयोगटातील लोक PMSBY साठी अर्ज करू शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत खाते असणे बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत विमा घेणार्‍याचा मृत्यू, अपघात किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. कायमस्वरुपी अर्धांगवायू आल्यास एक लाख रुपयांचे संरक्षण पुरवते. 18 ते 70 वर्षे वयोगटातील भारतीय केवळ 12 रुपये वार्षिक प्रीमियम देऊन PMSBY चा फायदा घेऊ शकतात. आपल्यालाही असाच लाभ मिळणार:- ➡️ आपल्याला या योजनेंतर्गत पॉलिसी घ्यायची असल्यास आपण थेट कोणत्याही बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त इतरही मार्ग आहेत, ज्याद्वारे आपण ही पॉलिसी घेऊ शकता. यामध्ये बँक मित्र, विमा एजंट आणि सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांचा समावेश आहे. त्याचे प्रीमियम थेट आपल्या बँक खात्यातून डेबिट केले जाते. कोरोनासारख्या कठीण काळात ही योजना ज्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे आणि जे आपल्या पैशांवर उपचार घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही एक वरदान आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
8
इतर लेख