AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
प्रगतीशील महिला शेतकरी ऑनलाईन चर्चासत्र!
सफलतेची कथाअ‍ॅग्रोस्टार
प्रगतीशील महिला शेतकरी ऑनलाईन चर्चासत्र!
अ‍ॅग्रोस्टारतर्फे महिला शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने यंदा हा उत्साह नुकताच ऑनलाईन माध्यमातून ‘प्रगतीशील महिला शेतकरी ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करून साजरा केला. या चर्चासत्रात प्रमुख वक्त्या महाराष्ट्रातील यशस्वीपूर्ण महिला शेतकरी स्वप्नाताई मगर (सोलापूर), सविताताई कुंभार (सांगली) व उज्वलाताई कोतकर (अहमदनगर) उपस्थित होत्या. या अ‍ॅग्रोस्टारच्या प्रगतीशील महिलांनी यावेळी आपल्या यशाचा प्रवास इतर महिला शेतकऱ्यांसमोर मांडला. या तिन्ही प्रगतीशील महिलांनी इतर महिलांना संदेश देत म्हणाल्या की, शेतकऱ्यांनो कठिण वेळेतदेखील सकारात्मक विचार करून यशाचा मार्ग सुरू ठेवायचा. या मार्गात कित्येक अडचणी आल्या, तरी डगमगायचे नाही. आपला हा प्रवास उत्तुंग भरारी घेण्यास सुरू ठेवायचा. सद्याच्या महिला या पुरूषाच्या खांदयाला खांदा लावून कामे करीत आहेत. आता आपल्याला आणखी एक पाऊल पुढे जायचे आहे. कृषी क्षेत्रात आपण अ‍ॅग्रोस्टारच्या साथीने प्रगतीशील शेती करूयात अन् यशाच्या शिखरावर पोहोचवुयात. या कार्यक्रमाला ५० पेक्षा अधिक शेतकरी महिला उपस्थित होत्या. यातील काही शेतकरी महिलांनी देखील आपले अनुभव सर्वांसोबत शेअर केले. अ‍ॅग्रोस्टार गोल्ड सर्व्हिसविषयीदेखील शेतकरी महिलांनी जाणून घेतले. ही गोल्ड सर्व्हिस म्हणजे ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत अ‍ॅग्री डॉक्टरांद्वारे अचूक मार्गदर्शन मिळविणे. एवढेच नाही, तर या सर्व्हिस अतंर्गत आपण आपल्या पिकाची समस्या व्हिडीओ काॅलिंगच्या माध्यमातून दाखवून, त्वरित मार्गदर्शनदेखील घेऊ शकता. या क्लासचा मुख्य उद्देश म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करुन कमी खर्चात, अधिक उत्पादन मिळवून देणे हा आहे. शेतकरी महिलांना स्मार्ट पद्धतीने शेती करता यावी, या उद्देशाने अ‍ॅग्रोस्टारतर्फे सहभागी झालेल्या महिलांपैकी तीन महिलांना लकी ड्राॅ पध्दतीने स्मार्टफोन, तर तीन महिलांना 'अ‍ॅग्रोस्टार गोल्ड लाईव्ह सेवा देण्याचे जाहीर केले. यामध्ये स्मार्टफोन विजेत्याचे मानकरी ज्ञानेश्वरीताई साठे (सोलापूर), कोमलताई गवळी (सोलापूर), आशाताई तट (बीड). तर अ‍ॅग्रोस्टार गोल्ड लाईव्ह सेवाच्या मानकरी सोनालीताई टेमकर, जयश्रीताई मदने,अलकाताई गजबे ठरल्या, अशा पद्धतीने हे चर्चासत्र उत्तम, ज्ञानमय आणि कुटुंबामय वातावरणात यशस्वी पार पडला. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार महाराष्ट्रातील शेतकरी महिलांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा व्हिडिओ अधिकाधिक लाइक अन् शेअर करा!
9
2