योजना व अनुदानAgrostar
प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मदत!
➡️शेतकरी कृषी अन्न प्रक्रिया उद्योग उभारून स्वतःची आर्थिक प्रगती करू शकतात. या प्रकारचे उद्योग उभारण्यासाठी सरकार मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना राबवत असून या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे.
➡️मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना ही 2017 ते 18 या वर्षापासून पाच वर्षाकरिता लागू करण्यात आली आहे व यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद देखील सरकारने केली आहे. योजनेच्या माध्यमातून शेतीमध्ये उत्पादन होणाऱ्या मालाचे मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. नाहीतर अशा उपक्रमामध्ये किंवा उद्योगांमध्ये शेतकऱ्यांच्या सहभागातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रकल्प उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.
➡️शेतीमध्ये जो काही शेतमाल उत्पादित होतो. त्या उत्पादित होणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी व ऊर्जेची बचत व्हावी यासाठी प्रकल्पाच्या आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या मालाला ग्राहकांचे पसंती मिळवून देऊन व विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करणे तसेच मालाचे निर्यात हाही उद्देश या योजनेमुळे साध्य करता येणार आहे.
➡️ योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?
1. यामध्ये प्रामुख्याने फळे, भाजीपाला, अन्नधान्य तसेच कडधान्य, तेलबिया उत्पादन इत्यादींवर आधारित अन्नप्रक्रिया प्रकल्प चालवणारे शेतकरी किंवा शासकीय व सार्वजनिक उद्योग.
2. शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा शेतकऱ्यांचा समूह.
3. महिला स्वयंसहायता बचत गट.
4.ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण व तरुणी.
5.सहकारी संस्था.
➡️योजनेच्या माध्यमातून किती मिळते आर्थिक मदत?
1. उद्योग उभारण्यासाठी 30% अनुदान म्हणजेच कमाल 50 लाख रुपये या माध्यमातून दिले जाते.
2. या योजनेअंतर्गत अनुदान हे दोन हप्त्यात विभागून देण्यात येते यातील पहिला हप्ता हा क्रेडिट लिंक बँक इंडेड सबसिडी या तत्त्वानुसार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर व दुसरा हप्ता हा जेव्हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने उत्पादन निर्माण करू लागतो तेव्हा देण्यात येतो.
3. या प्रकल्पासाठी जे काही अनुदान देण्यात येईल त्याच्या दीडपट कर्जाची रक्कम असणे गरजेचे आहे.
4.तसेच प्रकल्पांतर्गत मनुष्यबळ निर्मिती व विकास अनुदानासाठी प्रशिक्षण खर्चाच्या 50 टक्के अनुदान देण्यात येते.
➡️ संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.