पोस्ट ऑफिस च्या 'या' योजनेअंतर्गत मिळेल 16 लाखांचा फायदा!
समाचारलोकमत
पोस्ट ऑफिस च्या 'या' योजनेअंतर्गत मिळेल 16 लाखांचा फायदा!
➡️ जर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये सुद्धा चांगला परतावा मिळतो. ➡️ पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना चांगली असते. यामध्ये कमी किंमतीत गुंतवणूक केल्यास मोठी कमाई होते. अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणतात. तुम्हाला त्यात चांगले परतावा मिळतो. काय आहे पोस्ट ऑफिसची RD योजना? ➡️ या योजनेच्या माध्यमातून तुम्ही फारच कमी पैशाने गुंतवणूक सुरू करू शकता. याशिवाय तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतील. तुम्ही त्यात महिन्याला १०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. ➡️ तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता तरीही अधिकाधिक मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस RD डिपॉझिट खाते चांगल्या व्याजदरासोबत लहान हप्ते जमा करण्याची एक सरकारी हमी योजना आहे. जाणून घ्या, किती मिळेल व्याज? ➡️ पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले RD खाते ५ वर्षांसाठी आहे. त्यापेक्षा कमी काळासाठी उघडत नाही. दर तिमाहीत (सालना दराने) ठेवींवरील व्याज कॅलक्युलेशन केले जाते. त्यानंतर प्रत्येक तिमाहीच्या शेवटी हे आपल्या खात्यात चक्रवाढ व्याजासह जोडले जाते. ➡️ इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, RD योजनेवर सध्या ५.८ टक्के व्याज आकारले जात आहे. केंद्र सरकार दर तिमाहीत आपल्या सर्व छोट्या बचत योजनांमध्ये दर तिमाहीत व्याजदर जाहीर करते. ➡️ पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत तुम्ही दरमहा १०,००० रुपयांची गुंतवणूक १० वर्षांसाठी केली तर तुम्हाला म्यॅच्योरिटीवर १६,२६,४७६ लाख रुपये मिळतील. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
86
24
इतर लेख