AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्ट ​ऑफिस च्या 'या' ग्राहकांना दिलासा!
समाचारNews 18 lokmat
पोस्ट ​ऑफिस च्या 'या' ग्राहकांना दिलासा!
➡️ 15 ऑगस्ट: पोस्ट ऑफिसमध्ये खातं असल्यास किंवा कोणत्याही योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवले असल्यास काही व्यवहारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काम पूर्ण करावे लागते. मात्र ज्येष्ठ नागरिकांना वयोमानामुळे ते शक्य होईलच असे नाही. अशावेळी पोस्ट ऑफिसने या नागरिकांना दिलासा दिला आहे. ➡️ आतापर्यत पोस्ट ऑफिसमधील अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन, अकाउंट बंद करण्यासठी, प्रीमॅच्युअर विड्रॉल इ. कामांसाठी ज्येष्ठ नागरिकांना देखील पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागत असे. मात्र आता ज्येष्ठ नागरिकांचं हे काम कोणतीही अधिकृत व्यक्ती करू शकते. ➡️ अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना पोस्टात महत्त्वाचे काम आल्यास स्वत: जाण्याची आवश्यकता भासणार नाही जाणून घ्या काय आहे प्रक्रिया 1)सर्वात आधी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत जाऊन SB-12 हा फॉर्म भरावा लागेल. हे खातं जॉइंट असल्यास अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी अटेस्ट करावी लागेल. 2) अकाउंट होल्डरने योग्य फॉर्म भरणं आवश्यक आहे. कॅश विड्रॉलसाठी फॉर्म SB-7, खातं बंद करण्यासाठी फॉर्म SB-7B. शिवाय खातेधारक आणि अधिकृत करण्यात येणाऱ्या व्यक्तीचा सेल्फ अटेस्ट करण्यात आलेला फोटो आणि अॅड्रेस प्रूफ द्यावा लागेल. प्रत्येक व्यवहारासाठी एसबी-12 फॉर्म भरावा लागेल. 3) अधिकृत करण्यात आलेल्या व्यक्तीला पासबुक आणि हा फॉर्म सबमिट करावा लागेल. याशिवाय त्यांना ट्रान्झॅक्शन फॉर्मसह (SB-7/SB-7B इ.) KYC कागदपत्र द्यावी लागतील. 4)यानंतर पोस्टातील कर्मचारी अधिकृत व्यक्तीने दिलेली कागदपत्र, खातेधारकाची स्वाक्षरी पडताळून पाहतील. त्यानंतर सुपरव्हायजरकडून मंजुरी मिळाल्यानंतर व्यवहार पूर्ण केला जाईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख