पोस्ट ऑफिस ची 'ही' योजना ठरेल फायद्याची
कृषि वार्ताNews 18 lokmat
पोस्ट ऑफिस ची 'ही' योजना ठरेल फायद्याची
तुम्ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल अर्थात गुंतवणूक करताना कोणतीही जोखीम नको असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्टाच्या योजनांमध्ये कमी जोखमीसह जास्त रिटर्न मिळतो. पोस्ट ऑफिसच्या अशा काही स्मॉल सेव्हिंग स्कीम्स आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवू शकता. या योजनांपैकी एक महत्त्वाचा पर्याय पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट हा आहे. यामध्ये तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. काय आहे आरडी स्कीम? तुम्हाला कमी पैशांच्या गुंतवणुकीतून आरडी स्कीम सुरू करता येईल. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील. या आरडी योजनेमध्ये तुम्ही महिन्याला कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. यापेक्षा जास्त तुम्ही 10 च्या पटीमध्ये कितीही रुपयांची मासिक गुंतवणूक करता येईल. जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे. पोस्टाच्या आरडीमध्ये तुम्हाला चांगला व्याजदर मिळेल आणि सरकारी गॅरंटी असल्याने ही योजना सुरक्षित आहे. किती मिळेल व्याज? गुंतवणुकदारांच्या मते ही योजना खात्रीशीर रिटर्न देणारी योजना आहे. इंडिया पोस्ट वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर 5.8 टक्क्याने व्याज मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते पाच वर्षांसाठी उघडण्यात येते. हा पर्याय देखील एफडी प्रमाणेच एक चांगला आर्थिक पर्याय आहे. मात्र याठिकाणी गुंतवणुक अधिक फायद्याची आहे. एफडीमध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. तर आरडीमध्ये तुम्हाला एसआयपी प्रमाणे वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंटमध्ये महिन्याच्या महिन्याला गुंतवणूक करता येते. यामध्ये तुमच्या खात्यामध्ये व्याज तिमाही आधारावर कंपाउंडिंग होऊन जोडले जाते. दरम्यान सरकारकडून प्रत्येक तिमाहीला छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर अपडेट केले जातात. 10 हजारांच्या गुंतवणुकीस सुरुवात करून मिळवा 16 लाख तुम्ही जर दरमहा 10000 रुपयांची गुंतवणूक 10 वर्षांसाठी केली तर मोठा फंड उभारू शकता. सध्याच्या व्याजदराच्या आधारे तुम्हाला मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील. तुम्ही सलग चार हप्ते जमा करू शकला नाहीत तर तुमचं आरडी खातं बंद होईल. मात्र खातं बंद झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात ते पुन्हा सक्रीय करता येईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
1
इतर लेख