AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्ट ऑफिस ची धमाकेदार योजना, १ लाखाच्या गुंतवणुकीवर महिन्याला मिळेल उत्तम परतावा!
कृषी वार्ताTV9 Marathi
पोस्ट ऑफिस ची धमाकेदार योजना, १ लाखाच्या गुंतवणुकीवर महिन्याला मिळेल उत्तम परतावा!
👉गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा उत्तम पर्याय मानला जातो. इथं तुम्हाला चांगलं उत्पन्नही मिळतं. आज, आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशात एका बचत योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला वार्षिक ६.६ टक्के उत्पन्न मिळतं. या योजनेत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल आणि त्यावरून तुम्हाला मासिक व्याज उत्पन्न मिळेल. यामध्ये वैयक्तिक योगदानकर्ते साडेचार लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. तर जॉईंट खात्यात ९ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. 👉पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेचा लॉक-इन कालावधी ५ वर्षांचा आहे. यामध्ये पॉलिसी मॅच्यूअर झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला मासिक व्याज मिळतं. चांगाल रिटर्न मिळतो. १० वय झाल्यानंतर या पॉलिसीचा तुम्हाला जास्त फायदा मिळतो. अल्पवयीन व्यक्तीच्या नावेही योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत किमान १ हजार रुपये आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. गुंतवणूकीची रक्कम १०० च्या एकाधिक असणे आवश्यक आहे. १ लाख गुंतवणुकीसाठी दरवर्षी मिळतील ६६०० रुपये 👉या योजनेत गुंतवणूक केली तर साधं व्याज मोजलं जातं. तुम्ही १ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला एका वर्षामध्ये ६६०० रुपये आणि दरमहा ५५० रुपये मिळतील. म्हणजेच पाच वर्ष दरमहा भेटत राहतील. २ लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर ११००रुपये महिन्याला १३२०० रुपये आणि पाच वर्षांत एकूण ६६००0 रुपये मिळतील. 👉३ लाख गुंतवणूकीसाठी तुम्हाला १६५० रुपये, ४ लाखांच्या गुंतवणूकीसाठी तुम्हाला २२०० रुपये आणि साडेचार लाख रुपये गुंतवणूकीसाठी २४७५ रुपये मिळतील. एका वर्षात २९७०० रुपये आणि पाच वर्षात १ लाख ४८ हजार ५०० रुपये मिळतील. 👉सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेत जर एक वर्षानंतर आणि तीन वर्षांआधी गुंतवणूक मागे घेतली गेली तर २% कपात केली जाईल. तीन वर्षानंतर आणि पाच वर्षांआधी खातं बंद केलं तर १ टक्के कपात केली जाईल. संदर्भ - TV9 मराठी, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
79
13
इतर लेख