AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्ट ऑफिसमध्ये दररोज ९५ रुपये जमा करा, मॅच्युरिटीवर मिळतील १४ लाख रुपये!
कृषी वार्तान्यूज १८लोकमत
पोस्ट ऑफिसमध्ये दररोज ९५ रुपये जमा करा, मॅच्युरिटीवर मिळतील १४ लाख रुपये!
➡️ पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये अनेक जीवन विमा योजना आहेत, त्यापैकी एक ग्राम सुमंगल रुरल पोस्टल लाईफ इन्शोरन्स स्किम आहे. ही एक एंडोमेंट स्कीम आहे, जी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना मनीबॅकसह इन्शोरन्स कव्हरही देते. या स्किमअंतर्गत दोन प्रकारचे प्लॅन येतात. ➡️ या योजनेचा आणखी एक फायदा असा की, जर दररोज केवळ ९५ रुपयांच्या हिशोबाने यात गुंतवणूक केल्यास, या स्किमच्या शेवटपर्यंत १४ लाख रुपये मिळवता येऊ शकतात. रुरल पोस्टल लाईफ इन्शोरन्स स्किमची सुरुवात १९९५ मध्ये झाली होती. या स्किमअंतर्गत पोस्ट ऑफिस ६ वेगवेगळ्या विमा योजना देते. त्यापैकीच एक ही ग्राम सुमंगल आहे. काय आहे ग्राम सुमंगल स्किम - ➡️ हीपॉलिसी अशा लोकांसाठी अतिशय फायदेशीर आहे, ज्यांना वेळोवेळी पैशांची गरज पडते. मनीबॅक इन्शोरन्स पॉलिसी ग्राम सुमंगल योजनेत अधिकतर १० लाख रुपयांचा सम एश्योर्ड मिळतो. पॉलिसी घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू पॉलिसी अवधी काळात न झाल्यास, त्याला मनीबॅकचा फायदा मिळतो. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला सम एश्योर्डसह बोनस रक्कमही दिली जाते. ➡️ यात १५ वर्ष आणि २० वर्ष सामिल आहे. या पॉलिसीसाठी कमीत-कमी वय १९वर्ष असावं लागतं. अधिकतर ४५ वर्षीय व्यक्ती १५ वर्षांच्या अवधीसाठी या स्किमचा फायदा घेऊ शकतो. २० वर्षासाठी ही पॉलिसी अधिकतर ४० वर्षीय व्यक्ती घेऊ शकतो. मनीबॅक नियम - ➡️ १५ वर्षांच्या पॉलिसीमध्ये ६ वर्ष, ९ वर्ष, १२ वर्ष पूर्ण झाल्यानंतर २०-२० टक्के मनीबॅक मिळते. तर मॅच्युरिटीवर बोनससह बाकी ४० टक्के पैसा दिला जाईल. अशाप्रकारे, २० वर्षाच्या पॉलिसीमध्ये ८ वर्ष, १२ वर्ष आणि १६ वर्षांच्या अवधीवर २०-२० टक्के पैसे मिळतात. बाकी ४० टक्के पैसे बोनससह मॅच्युरिटीवर दिले जातात. दररोज ९५ रुपये प्रीमियम - ➡️ जर २५ वर्षीय व्यक्ती ७ लाख रुपयांच्या सम एश्योर्डसह ही पॉलिसी २० वर्षासाठी घेतल्यास, त्याला प्रत्येक महिन्याला २८५३ रुपये प्रीमियम पडेल. म्हणजेच दररोजच्या हिशोबाने जवळपास ९५ रुपये. तिमाही प्रीमियम ८४४९ रुपये, सहामाही प्रीमियम १६७१५ रुपये आणि वार्षिक प्रीमियम ३१७३५ रुपये असेल. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -न्यूज १८लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
44
14
इतर लेख