AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक ठरेल फायद्याची!
कृषी वार्तान्यूज १८ लोकमत,
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक ठरेल फायद्याची!
➡️ कोरोनाच्या काळात तुम्ही मुदत ठेवीत पैसे ठेवले तरीही फारसं चांगलं व्याज मिळत नाही. मग जर तुम्हाला तुमची रक्कम दुप्पट करायची म्हटलं तर पर्यायच नाही असं वाटेल. पण आम्ही आज तुम्हाला एक अशी स्कीम सांगणार आहोत ज्यात तुम्ही रक्कम ठेवली तर काही महिन्यांत ती दुप्पट होईल. भारतीय पोस्टाची ही स्कीम असल्याने यात जोखीम कमी आहे आणि तुमच्या पैशांची बचतही होते. ➡️पोस्टाच्यावतीने ग्राहकांसाठी गुंतवणुकीच्या अनेक स्कीम्स चालवल्या जातात. त्यातील एक म्हणजे किसान विकास पत्र योजना. या योजनेत तुम्ही पैसे गुंतवले तर 124 महिन्यांनंतर तुमचे पैसे दुप्पट होईल. जाणून घ्या कसं ते. ➡️ भारत सरकारच्या पोस्ट खात्याच्या वतीने चालवली जाणारी किसान विकास पत्र ही योजना वन टाइम इन्व्हेस्टमेंट योजना आहे. त्यात पैसे गुंतवल्यास ठराविक काळानंतर गुंतवलेली रक्कम दुप्पट होते. भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसात जाऊन तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. किती व्याज मिळेल? ➡️ KVP गुंतवणुकीवर आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत सरकारने 6.9 टक्के व्याज दर निश्चित केला आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली की ती 124 महिन्यांत दुप्पट. जर तुम्ही एकदम 1 लाख रुपये या योजनेत गुंतवले तर ठरलेल्या 124 महिन्यांच्या काळानंतर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील. कमीतकमी इतकी गुंतवणूक आवश्यक ➡️ तुम्हाला या योजनेत कमीतकमी 1 हजार रुपये गुंतवणं बंधनकारक आहे जास्तीत जास्त तुम्ही कितीही रुपये गुंतवू शकता. ही गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं. या योजनेअंतर्गत 1 हजार, 2 हजार, पाच हजार, 10 हजार आणि 50 हजार रुपयांची सर्टिफिकेट्स दिली जातात. त्यात तुम्हाला सरकारच्यावतीने हमी दिली जाते. त्यामुळे या गुतंवणुकीची जोखीम खूप कमी होते. पैसे बुडण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यामुळे हा पर्याय सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने मोलाचा ठरतो. कोण काढू शकतं खातं? ➡️ कुणीही सज्ञान व्यक्ती किंवा तीन सज्ञान व्यक्ती मिळून जॉइंट अकाउंट काढून गुतंवणूक करू शकतात. 10 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती किसान विकास पत्रात गुंतवणूक करू शकते. त्याचबरोबर अज्ञान व्यक्तीसाठी सज्ञान व्यक्ती किसान विकास पत्रांमध्ये गुंतवणूक करू शकते. मतिमंद व्यक्तीसाठी त्याचे पालक किसान विकास पत्र खरेदी करून त्यात गुंतवणूक करू शकतात. खातं उघडायचं कसं? ➡️ कोणत्याही पोस्ट ऑफिसात जाऊन तुम्हाला किसान विकास पत्रात गुंतवणुकीसाठी अर्ज भरावा लागेल. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट यापैकी एकाची मूळ प्रत सोबत घेऊन जा आणि मगच अर्ज करा. पालक आपल्या पाल्यासाठी आणि सज्ञान व्यक्ती जॉइंट अकाउंटही उघडू शकतात. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.➡️ ➡️
6
7
इतर लेख