AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 पोस्ट ऑफिसची फ्रेंचाइजी उघडा; दरमहा होईल मोठी कमाई!
व्यवसाय कल्पनान्यूज १८लोकमत
पोस्ट ऑफिसची फ्रेंचाइजी उघडा; दरमहा होईल मोठी कमाई!
➡️पोस्ट ऑफिस लाखो लोकांना रोजगारही देते. सुरू असलेल्या टपाल सप्ताहाच्या निमित्ताने आपण पोस्ट ऑफिसच्यामधून नवा रोजगाराचा पर्याय काय आहे, याची माहिती घेऊया. ➡️तुम्ही पोस्ट ऑफिसचे एजंट म्हणून काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला ना जास्त भांडवलाची गरज आहे ना कुठल्या पदवी-डिप्लोमाची. अगदी आठवी उत्तीर्ण झालेली व्यक्ती देखील पोस्ट ऑफिसची एजन्सी मिळवून काम सुरू करू शकते. पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी (एजन्सी) घेऊन तुम्ही दरमहा ५० हजार रुपयांपर्यंत कमवू शकता. फ्रेंचाइजी घेऊन तुम्ही गावात किंवा शहरात कुठेतरी पोस्ट ऑफिसमध्ये काम करून कमाई सुरू करू शकता. ➡️कोणताही भारतीय नागरिक हे काम करू शकतो. फ्रेंचाइजी घेणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. फ्रँचायझी घेऊ इच्छिणारी व्यक्ती आठवी पास असावी. पोस्ट ऑफिस फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्ही कमिशनद्वारे पैसे कमावता. यामध्ये, तुम्ही नोंदणीकृत लेख, स्पीड पोस्ट बुकिंग, मनी ऑर्डर, रजिस्ट्री, टपाल तिकिटे, पोस्टल स्टेशनरी आणि मनीऑर्डर फॉर्म विकण्यासह पोस्टाच्या सेवा देऊन पैसे कमावू शकता. फ्रेंचाइजी कशी मिळवायची ➡️पोस्ट ऑफिसमध्ये दोन प्रकारच्या फ्रँचायझी आहेत. एक आउटलेट फ्रँचायझी आणि दुसरी पोस्टल एजंट फ्रँचायझी. तुम्ही या दोन फ्रँचायझीपैकी कोणतीही घेऊ शकता. या व्यतिरिक्त, एजंट जे शहरी आणि ग्रामीण भागात टपाल तिकिटे आणि स्टेशनरी घरोघरी पोहोचवतात. हे टपाल एजंट फ्रँचायझी म्हणून ओळखले जातात. ➡️फ्रेंचाइजीसाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याला पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करून तो व्यवस्थित भरून द्यावा लागेल. अर्ज केल्यानंतर, फ्रँचायझीसाठी निवड झालेल्या सर्वांना पोस्ट विभागाशी करार करावा लागेल. या करारानंतर तुम्ही टपाल खात्यात पुरवलेल्या सुविधा लोकांना देण्याचे काम सुरू करू शकता. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
10